जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir) लष्करानं ‘मिशन झिरो टेररीझम’ सुरु केलं असून गेल्या 18 तासात तब्बल 7 अतिरेक्यांचा खात्मा (Terrorist Killed) करण्यात आलाय. एकूण तीन वेगवेगळ्या एन्काऊटंरमध्ये सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय. यानंतर लष्कराच्या (Indian Army) जवानांकडून सर्च ऑपरेशनही केलं जातंय. लष्कर ए तोयबाचे चार अतिरेकी, जैशचे दोन अतिरेकी ठार करण्यात आलेत. कुपवाडा, पुलावामासह कुलगामध्ये लष्कराकडून करण्यात आलेल्या एन्काऊटंरमध्ये ही कारवाई करण्यात आली. कुपवाडाच्या लोलाब इथं झालेल्या चकमकीमध्ये चार लष्कर ए तोयबाचे अतिरेकी मारण्यात आले. तर डीएच पोरा कुलगाममध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोघा जैशच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर छातपुरा या पुलवामा येथील चकमकीमध्ये एका लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला. सध्या या तिन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जातंय.
भारतीय लष्करानं गेल्या 24 तासांत केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे जम्मू काश्मिरातील अतिरेक्यांचं धाबं दणाणलंय. सध्या या ठिकाणी सर्च ऑपरेशन जारी असून पुढील तपास केला जातोय.
#BreakingNews
In the last 18 hours, 7 militants have been killed in 3 encounters in Kashmir. A total of 4 Lashkar militants killed in the Lolab Kupwara encounter, 2 Jaish militants killed in DH Pora Kulgam encounter & 1 Lashkar militant killed in the Chatpora Pulwama encounter. pic.twitter.com/pnVn0mIwBh— DD News (@DDNewslive) June 20, 2022
रविवारी कुपवाडा आणि कुलगाममध्ये सकाळपासूनच चकमक सुरु झाली होती. या चकमकीदरम्यान काही अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती स्थानिक पोलिसांसह लष्कराला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरुवातील चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर एका पाकिस्तानी रहिवासीही चकमकीत ठार झाला होता. दरम्यान, त्यानंतर आणखी तिघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मिरात शनिवारी पुलवामामध्ये एका पोलीसाची हत्या करण्यात आलेल. पोलीस सब इन्स्पेक्टरचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. या पोलिसांची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्याआधीही अतिरेक्यांकडून टार्गेट किलिंग करण्यात आलेलं. या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत सात अतिरेक्यांचा खात्मा केलाय.