नवी दिल्ली – अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)आगामी सिनेमा राम सेतू (Ram Setu)हा सुब्रमण्यम स्वामी (BJP Subramanyam Swami)यांच्या निशाण्यावर आहे. राम सेतूबाबत चुकीची तथ्ये सिनेमात दाखवली जात असल्याचा स्वामींचा आरोप आहे. शनिवारी दोन ट्विट करत त्यांनी सिनेमाचे निर्मिते आणि अक्षयकुमारविरोधात खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. जर अक्षयकुमार हा परदेशी नागरिक असेल तर त्याला अटक करण्याची आणि देशातून बेदखल करण्याची मागणीही करु शकतो, असेही सुब्रमण्यम स्वामींनी सांगितले आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की- मी अक्षय कुमार आणि त्यांच्या कर्मा मीडियाच्या विरोधात खटला दाखल करणार आहे. त्यांच्या आगामी सिनेमात त्यांनी राम सेतू अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केला आहे. त्यांच्या या सिनेमाने राम सेतूच्या प्रतिमेचे नुकसान झाले आहे. माझे वकील सत्य सभरवाल यांनी खटल्याचा ड्राफ्टही फायनल केलेला आहे.
The suit for compensation has been finalised by my associate Satya Sabharwal Adv. I am suing Akshay Kumar, actor & Karma Media for damages cause by falsification in portrayal of the Ram Setu issue in their film for release.
हे सुद्धा वाचा— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022
सुब्रमण्यम स्वामी यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये अक्षयकुमारला देशातून बेदखल करण्याचाही इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की – अक्षय कुमार एक विदेशी नागरिक आहे. तर आम्ही त्याला अटक करण्यासोबतच, देशातून बेदखल करण्यासाठीगी सांगू शकतो.
If Actor Akshay Kumar is a foreign citizen then we can ask he be arrested and evicted his adopted country.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022
राम सेतूचा पोस्टर लुकताच रिलिज करण्यात आला आहे. त्या पोस्टरला पाहून अनेकांनी अक्षयकुमारला चांगलेच ट्रोल केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षयकुमार एका गुहेच्या समोर उभा असून, त्याच्या हातातील मशालीने काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्यासोबत असलेल्या जॅकलिनच्या हातात टॉर्चही आहे. पोस्टरमध्ये एकाचवेळी टॉर्च आणि मशाल पाहून युझर्सनी दोन्ही कलाकारांना चांगलेच ट्रोल केले आहे.
राम सेतू सिनेमात अक्षय कुमार एका आर्किओलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या राम सेतूच्या सत्यावर प्रकाश टाकण्याचे काम सिनेमात तो करत असतो. या सिनेमाचे शूटिंग मुंबईसह, अयोध्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. सिनेमाचे शूटिंग जरी मुंबईत सुरु झाले असले तरी या सिनेमाचा मुहुर्ताचा शॉट अयोध्येत घेण्यात आला होता.
अक्षयकुमारच्या व्यतिरिक्त या सिनेमात जैकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा हेही प्रमुख भूमिकेत आहेत. अभिषेक शर्मा यानी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर विक्रम मल्होत्रा आमि अरुणा भाटिया या सिनेमाचे निर्माते आहेत. डॉ. चंद्रप्रकाश द्विदेदी हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. सध्याची रीलिजची तारीख 24 ऑक्टोबर 2022 आहे.