BJP News | आता इथे रहायच नाही…’ स्थानिक भाजप नेता महिलांसमोर करतो लुघशंका’

| Updated on: Nov 07, 2023 | 11:13 AM

BJP News | स्थानिक भाजपा नेत्याच्या दादागिरीला कंटाळून लोकांनी आता आपल्या घराबाहेर घरविक्रीचे पोस्टर चिकटवले आहेत. अनेकदा त्याच्या कृत्यांमुळे महिला लज्जित होतात. सदर व्यक्ती भाजपाच्या एससी एसटी मोर्चाचा महामंत्री असल्याचे सांगतो.

BJP News | आता इथे रहायच नाही... स्थानिक भाजप नेता महिलांसमोर करतो लुघशंका
bjp leader
Follow us on

लखनऊ : भाजपा स्थानिक नेत्याच्या दादागिरीच एक प्रकरण समोर आलय. भाजपाच्या एससी एसटी मोर्चाशी संबंधित हा नेता दारु पिऊन परिसरात धिंगाणा घालतो. त्याची हिम्मत इतकी आहे की, महिलांसमोरच तो लुघशंका सुद्धा करतो. या भाजपा नेत्याला कोणी विरोध केला, तर एससी एसटी एक्टमध्ये अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देतो. परिसरातील लोकांनी अनेकदा याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर ‘घर विक्रीसाठी आहे’ असे पोस्टर चिकटवले. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील हे प्रकरण आहे.

अलीगढच्या के सासनीगेट पोलीस ठाणा क्षेत्रातील हे प्रकरण आहे. परिसरातील नागरिकांनी आपल्या दरवाजावर पोस्टर चिकटवले आहेत. स्वत:ला भाजपा एससी मोर्चाचा महामंत्री म्हणणाऱ्या या नेत्यामुळे लोक हैराण आहेत. त्याच्या दादागिरीमुळे लोकांना आपलं राहत घर विकायच आहे. हा नेता दररोज दारु पिऊन येतो. लोकांना शिवीगाळ करतो. अभ्रद व्यवहार करतो. महिलांना शिवीगाळ करत त्यांच्यासमोरच लघुशंका करतो. स्थानिक नागरिकांनी हे आरोप केले आहेत.

पोलिसांच्या दुर्लक्षाचा उचलतो फायदा

लोकांनी सांगितलं की, “अनेकदा आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. पण पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही” त्यामुळे त्रस्त झालेले लोक आता आपल घर विकण्याचा विचार करतायत. संबंधित व्यक्ती पोलिसांच्या दुर्लक्षाचा फायदा उचलून लोकांनाच उलट एससी, एसटी एक्टमध्ये अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देतो. सदर व्यक्तीचा बऱ्याच काळापासून त्रास असल्याच स्थानिकांनी सांगितलं.

पुष्पा देवीने काय सांगितलं?

त्याच्या या कृत्यांमुळे अनेकदा महिला लज्जित होतात. आरोपी स्वत:ला एससी मोर्चाचा महामंत्री असल्याच सांगतो. संघटनेत चौकशी केल्यानंतर तो पक्षात कार्यकर्ता असल्याच समजलं. याच परिसरात राहणाऱ्या राकेशने सांगितलं की, “त्याच्या कृत्यामुळे कंटाळून आम्ही आमच्या घराबाहेर घरविक्रीच पोस्टर चिकटवले आहेत” याच परिसरात राहणाऱ्या पुष्पा देवीने सांगितलं की, “अर्जुन माहौर दारुच्या नशेत महिला, मुलींसमोरच लघुशंका करतो. विरोध केल्यानतंर त्यांना शिवीगाळ करतो”