आयकर विभागाचा व्यापाऱ्याकडे छापा, 25 किलो सोने, 4 कोटींची रोकड, 8 लॉकर… मुंबईसह देशभरातील 23 ठिकाणांवर छापेमारी

| Updated on: Nov 30, 2024 | 2:55 PM

Income Tax Raid: 28 नोव्हेंबर रोजी सुरु झालेली कारवाई अद्यापही सुरु आहे. या कंपनीच्या उदयपूर, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबईसह 23 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाचा व्यापाऱ्याकडे छापा, 25 किलो सोने, 4 कोटींची रोकड, 8 लॉकर... मुंबईसह देशभरातील 23 ठिकाणांवर छापेमारी
income tax raid
Follow us on

Income Tax Raid: आयकर विभागाने एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती उघड झाली आहे. त्यात 25 किलो सोने, 4 कोटींची रोकड मिळाली आहे. मुंबईसह देशभरातील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापेमारी सुरु केली आहे. राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीवर ही छापेमारी झाली. टीकमसिंह राव यांच्या घरीच 4 कोटींची रोकड 18 कोटींचे 25 किलो सोने मिळाले आहे. तसेच गोल्डन अँड लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधूनही कोट्यवधी रुपयांची कागदपत्रे मिळाली आहे.

23 ठिकाणांवर छापेमारी

आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यापारी टीकमसिंह राव यांच्या कंपनीत अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याची चौकशी केल्यावर ती माहिती खरी आढळली. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या टीमने महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये छापेमारी केली. गुजरातमधील 2 ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी, राजस्थानमधील बांसवाडा येथील तीन ठिकाणी, जयपूरच्या विश्वकर्मा इंडस्ट्रियल एरियात एके ठिकाणी आणि उदयपूरमधील 19 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.

जयपूरच्या आयकर विभागाचे प्रमुख निदेशक अवधेश कुमार यांनी सांगितले की, 28 नोव्हेंबर रोजी सुरु झालेली कारवाई अद्यापही सुरु आहे. या कंपनीच्या उदयपूर, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबईसह 23 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.

18 कोटी 34 लाख रुपयांचे सोने

शुक्रवारी उदयपूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक टिकम सिंग यांच्या 19 वेगवेगळ्या ठिकाणी झडती घेण्यात आली. यावेळी हे पथक हिरण माग्री सेक्टर-13 येथील घरात पोहोचले, तेथून 25 किलो सोने सापडले. त्याची किंमत अंदाजे 18 कोटी 34 लाख रुपये आहे. हे सोने टिकम सिंग यांच्या दुकानात आणि व्यावसायिक जागेवर सापडले. याशिवाय येथे रोकडही सापडली आहे. झडतीदरम्यान 8 लॉकर्सचे रेकॉर्डही सापडले आहे. या लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.