Income Tax Raids: देशात दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. झारखंडमधील मतदान 13 नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रातील मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा ज्वर वाढला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी सुरु झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी सुरु आहे. रांची आणि जमशेदपूरमधे ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्यामुळे सोरेन यांच्यासमोर अडचण निर्माण होणार आहे.
सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. त्यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने झारखंडमधीलच नाही तर देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकरातील हेराफेरीमुळे ही छापेमारी करण्यात आली आहे. सुनील श्रीवास्तव यांनी आयकरात हेराफेर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने छापेमारी केली होती. हवालाच्या माध्यमातून व्यवहार झाल्यामुळे रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकातामध्ये छापेमारी केली होती. त्यावेळी हवाला व्यापाऱ्यांच्या ठिकाणाहून बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित 150 कोटी रुपयांची कागदपत्रे जप्त केली होती.
#WATCH झारखंड: मुख्यमंत्री हेमंत सोरेन के निजी सचिव सुनील श्रीवास्तव के रांची स्थित आवास पर केंद्रीय एजेंसी की छापेमारी जारी है।
अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/ay1pJ7wZhg
— ANI_HindiNews (@AHindinews) November 9, 2024
यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी हेमंत सरकारचे मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. या काळात ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले होते. जलजीवन अभियानाशी संबंधित योजनांमधील अनियमिततेबाबत हा छापा टाकण्यात आला. अमंलबजावणी संचालनालयाच्याा टीमने मिथलेश ठाकूर, विनय ठाकूर, खासगी सचिव हरेंद्र सिंह समेत अनेक इंजिनिअरच्या घरी छापेमारी केली होती.