मुंबई: आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन! देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. आज देशभरात लोकांचा उत्साह बघण्यासारखा आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर स्वातंत्र्यदिनाची शायरी, स्लोगन टाकले जातायत. मेसेज करताना सुद्धा लोक शुभेच्छा देताना एकदम हटके शुभेच्छा देत आहेत. आज तर गुगलवर सुद्धा देशभक्तीपर गीते, शायरी, कोट्स, घोषणा हे सगळं ट्रेंड होतंय. तुम्हाला आठवतं का लहानपणी शाळेत असताना आपण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी खूप उत्सुक असायचो. तेव्हा आपण अनेक घोषणा द्यायचो. ‘वंदे मातरम्’, ‘इंकलाब जिंदाबाद’,’सत्यमेव जयते’, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’! आठवतंय? या घोषणा पहिल्यांदा कुणी दिल्या? त्या कुणी लिहिल्या? माहितेय? आज आम्ही तुम्हाला अशाच काही घोषणा सांगणार आहोत. या घोषणा कुणी लिहिल्या, कुणाच्या आहेत तेही तुम्ही वाचा. शुभेच्छा देताना या घोषणा देखील वापरा कारण या घोषणा आपला अभिमान आहेत.