Independence day 2024: देशात आज 78 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर बदल केला झाला आहे. अनेक कठीण प्रसंगातून वाट काढत देशाने नवीन विकासाचे पल्ले गाठले आहे. अनेक नवीन कीर्तीमान बनवले आहे. मग मंगळयान किंवा चंद्रयान असो की निर्माण झालेली हरितक्रांती असो… आता 2047 पर्यंत विकसित भारत होण्याकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत भारत आला आहे.
एकीकडे देशाचा स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईने देखील कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?
वस्तू/पदार्थ | 1947 मध्ये किती होता दर? | आता काय आहे किंमत? |
सोने (10 ग्रॅम) | 88.62 रुपये (10 ग्रॅम) | 72430 (10 ग्रॅम) |
पेट्रोल (एक लीटर) | 27 पैसे | 103.44 रुपये |
तांदुळ (प्रती किलो) | 12 पैसे | 45 रुपये |
साखर (प्रती किलो) | 40 पैसे | 44 रुपये |
बटाटे (प्रती किलो) | 25 पैसे | 40 रुपये |
दूध (एक लीटर) | 12 पैसे | 60 रुपये |