जम्मू-कश्मीरमध्ये बहुमतासाठी कांटे की टक्कर, अपक्ष आमदार ठरवणार सरकार?

| Updated on: Oct 05, 2024 | 7:50 PM

Jammu Kashmir Exit Poll Result 2024 : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले. आज या केंद्रशासित प्रदेशाच्या एक्झिट पोलचे निकालही समोर आले आहेत. 8 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण त्याआधी वेगवेगळे एक्झिट पोल समोर येत आहेत.

जम्मू-कश्मीरमध्ये बहुमतासाठी कांटे की टक्कर, अपक्ष आमदार ठरवणार सरकार?
Follow us on

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी आज वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान झालंय. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढत होती. तर इंजिनिअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष देखील या विधानसभा निवडणुकीत रिंगणार होती.

जम्मू-काश्मीरमधील 90 जागांपैकी आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोल सर्वेक्षणानुसार,

  • एनसी आणि काँग्रेस आघाडीला 40 ते 48 जागा
  • भाजपला 27 ते 32 जागा मिळू शकतात.
  • पीडीपीला 6-12 जागा मिळू शकतात.
  • इतरांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काश्मीर खोऱ्यातील भाजपला मोठा झटका बसला आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपने खूप कमी जागांवर उमेदवार उभे केले होते. आता तेथील 47 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 29-33 जागा मिळू शकतात. पण भाजपला फक्त 0-1 जागा, पीडीपीला 6-10 जागा आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला ४१.१ टक्के मतं, भाजपला ३ टक्के मतं, पीडीपीला १६.६ टक्के मतं आणि इतरांना ३९.९ टक्के मते मिळू शकतात.

  • नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला 11-15 जागा
  • भाजपला 27-31 जागा
  • पीडीपीला 0-2 जागा मिळण्याची शक्यता

जम्मूच्या 43 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला 36.4 टक्के मतं, भाजपल जम्मूमध्ये 41.3 टक्के मतं, पीडीपीला 4.4 टक्के मते मिळतील, तर इतरांना 17.9 टक्के मते मिळतील अशी अपेक्षा आहे.

जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर मतदान झाले. आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोल सर्वेक्षणानुसार,

  • एनसी आणि काँग्रेस आघाडीला 40 ते 48 जागा
  • भाजपला 27 ते 32 जागा
  • पीडीपीला 6-12 जागा
  • इतरांना 6-11 जागा

त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येताना दिसत आहे. पण अशाही काही जागा आहेत जिथे कांटे की टक्कर आहे. त्यात जर भाजपला पुढे निघता आले तर मग बहुमतासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना महत्त्व येऊ शकते. कारण त्यांच्या पाठिंब्यानेच येथे सरकार येऊ शकते. त्यामुळे आता निकाल काय येतो हे ८ तारखेलाच समोर येणार आहे.