नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना दिल्लीत जी20 संमेलनाला हजेरी न लावणे त्यांना महागात पडू शकते. पूर्व मध्य देशांवरील चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी खास योजनेला मूर्तरुप आणण्यात भारताला यश आले आहे. जी20 संमेलनात (G20 Summit) याविषयीची मोठी संयुक्त पायाभूत सुविधेसाठीच्या करारावर बोलणी झाली आहे. अमेरिकेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर या मंचामुळे भारताला जागतिक रेल्वे नकाशावर दबदबा निर्माण करण्याची आयाती संधी चालून आली आहे. वन बेल्ट वन रोड आणि थेट मध्यपूर्वेशी रेल्वे सेवा देण्याच्या चीनच्या महत्वकांक्षेला हे उत्तर असल्याचे बोलले जात आहे.
मोठे रेल्वे नेटवर्क उभारणार
मध्यपूर्व देशात चीनचा प्रभाव वाढला आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन हे देश मांडलीक करण्याचा सपाटाच चीनने सुरु केला आहे. त्याला शह देण्यासाठी अमेरिकेला सहकारी देशांची गरज होती. त्यात आखाती देश आणि भारताने हात पुढे केला आहे. अरब आणि आखाती देशात एक रेल्वे नेटवर्क उभे करणे, मध्य पूर्वेतून आशियापर्यंत रेल्वे जाळे विणण्यात येणार आहे. या क्षेत्रातील बंदरांना आणि व्यापाराला यामुळे चालना मिळेल. चीनची दहशत मोडण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल.
भारत-अमेरिकेत करार
2005 ते 2022 यादरम्यान चीनने मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका देशात 273 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या भागात चीनने पायाभूत सुविधा पण उभारल्या आहेत. या भागातील अनेक कर्ज बाजारीपणामुळे चीनच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चीनच्या या वाढत्या साम्राज्याला पायबंद घालण्यासाठी भारत आणि अमेरिकेत आता करार होत आहे.
संयुक्त अरब आणि युएई पण चीनच्या जाळ्यात
संयुक्त अरब अमिरात आणि युएई या देशांना चीनने जाळ्यात ओढले आहे. चीन या दोन देशांना ब्रिक्स देशांच्या मंचावर प्रवेश देण्यासाठी वकिली करत आहे. दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स देशांचे संमेलन झाले त्यावेळी चीनने मोठी चाल खेळली. भारताला एकटं पाडण्याचा पण प्रयत्न केला. अमेरिका, डॉलर, जागतिक व्यापार यावर मालकी आणण्याचा चीनचा मनसुबा आहे. त्यासाठी अनेक मंचाचा चीन वापर करत आहे. चीन पुढील महिन्यात बेल्ट अँड रोड शिखर आयोजीत करत आहे. त्यात रशियाला सोबत घेत मध्यपूर्वेतील देश कवेत घेण्याचा चीन प्रयत्न करेल. या संमेलनातून चीन सर्वच देशांना त्याची शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे.
रेल्वे नेटवर्कचा फायदा
चीनवर मात करण्यासाठी अमेरिका, युएई, सौदी अरब आणि भारत विशाल रेल्वे नेटवर्क उभे करणार आहे. या प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर आशियातून थेट मध्यपूर्वेत रेल्वेने प्रवास करता येईल. अनेक व्यापारी पेठांपर्यंत हा रेल्वे मार्ग नेण्याची योजना आहे. त्यामुळे मालाची आवक आणि जावक वाढले. त्याचा भारताला फायदा होईल. पाकिस्तानला आणि चीनला शह देण्यासाठी भारताला या रेल्वे रुटचा वापर करता येईल. तसेच निर्यातीसाठी वापर वाढेल.