भारतात 5G नेटवर्क सुरु होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. वर्षभरापूर्वी 5G नेटवर्कचा वेग खूपच खराब होता. परंतु वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. भारतातील 5G नेटवर्कचा स्पीड चांगलाच सुधारला आहे. यामध्ये भारताने ‘हनुमान उडी’ घेतली आहे. भारत जगभरातील बड्या देशांना मागे सोडत 5G नेटवर्कमध्ये टॉप 15 देशांच्या यादीत पोहचला आहे. या पंधरा देशांमध्ये 5G नेटवर्कचा वेग सर्वाधिक चांगला आहे. भारतात जिओ आणि एअरटेलकडून हायस्पीड 5G नेटवर्कची सेवा दिली जात आहे. भारतात मेट्रो सिटीमध्ये 5G सेवा सुरु झाली आहे. परंतु अजून ही सेवा सामान्य शहरांमध्ये सुरु झाली नाही. या वर्षभरात देशात सर्वत्र 5G नेटवर्क सुरु होण्याची शक्यता आहे.
नेटवर्क टेस्टिंग आणि एनालिस्ट फर्म Ookla च्या अहवालानुसार, 2024 भारत 5G डाउनलोडिंग स्पीडच्या बाबत 14 व्या क्रमांकावर होता. भारतात ही स्पीड 301.86 Mbps होती. त्यावेळी मीडियन अपलोडिंग स्पीड 18.93 mbps राहिली.
भारत 5G रोलआउट सर्वात वेगवान करण्याच्या बाबतीत जगात सर्वात पुढे आहे. भारतात डिसेंबर 2023 पर्यंत 400 हजार 5G बेस स्टेशन होते. जानेवारी 2023 नुसार विचार केल्यास त्यात तब्बल 7.7 टक्के वाढ झाली आहे. 2023 चौथ्या तिमाहीत 5G मीडियन डाउनलोडिंग स्पीड 301.86 mbps होती. 4G स्पीडच्या तुलनेत ही 18 पट वेगवान होते. तसेच 5G अपलोडिंग स्पीड 16.05 mbps नोंदवण्यात आली. ती 4G च्या तुलनेत 5 पट फास्ट होती.