India-Maldives row | ‘आमची वाट लागलीय’, मालदीवच्या ‘या’ नेत्याने भारतात येऊन मागितली माफी

| Updated on: Mar 09, 2024 | 10:58 AM

India-Maldives row | भारत विरोधाच्या आता मालदीवला झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मालदीवचा एक माजी राष्ट्रप्रमुख भारतात आला आहे. या नेत्याने भारताच भरभरुन गुणगान केलं. आपण काय चूक केलीय? हे आता मालदीवला उमगतय. भारत विरोध त्यांना परवडणारा नाहीय. यात त्यांचच जास्त नुकसान आहे.

India-Maldives row | आमची वाट लागलीय, मालदीवच्या या नेत्याने भारतात येऊन मागितली माफी
mohamed nasheed
Follow us on

India-Maldives row | सध्या भारत आणि मालदीवमध्ये फार चांगले संबंध राहिलेले नाहीयत. मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी भारतविरोधी प्रचार करुन निवडणूक जिंकली होती. त्यांचा कल चीनकडे जास्त आहे. मुइज्जू यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या सरकारच्या धोरणांमध्ये दिसून आला. परिणामी दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. मालदीवला याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मोहम्मद मुइज्जू विरोधात असले, तरी मालदीवचे दुसरे नेते मात्र भारताच्या बाजूने आहेत. त्यांनी भारतात येऊन माफी मागितली आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी बहिष्काराबद्दल चिंता व्यक्त केलीय.

भारताच्या बहिष्काराचा आमच्या पर्यटन उद्योगावर परिमाम झालाय. मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारताची माफी मागितली. भारतीय पर्यटकांनी आमच्या देशात यावं, हीच माझी इच्छा आहे, असं मोहम्मद नशीद म्हणाले. नशीद सध्या भारतात आहेत. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ते मीडियाशी बोलले. मालदीवच्या लोकांना माफ करा असं ते म्हणाले. “भारताच्या बहिष्काराचा मालदीववर परिणाम झालाय. मला याची चिंता वाटते. मला आणि मालदीवच्या जनतेला जे घडलं त्याबद्दल खेद आहे” असं मोहम्मद नशीद म्हणाले.

मालदीवचा हा नेता अजून काय म्हणाला?

हे सुद्धा वाचा

“मोहम्मद नशीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मी काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. पीएम मोदी यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पीएम मोदी यांचा मोठा समर्थक आहे. मी सुद्धा मोदींना शुभेच्छा देतो” असं असं मोहम्मद नशीद म्हणाले. बहिष्कारासाठी जबाबदार व्यक्तींना तात्काळ हटवण्याच विद्यमान राष्ट्रपतींनी पाऊल उचललं, त्या बद्दल नशीद यांनी कौतुक केलं. “वादावर तोडगा काढून द्विपक्षीय संबंध पुन्हा पूर्वीसारखे सामान्य केले पाहिजेत” असं मोहम्मद नशीद म्हणाले.

भारताच कौतुक करताना नशीद काय म्हणाले?

“भारतीय सैनिकांनी मालदीव सोडून जावं, अशी आमच्या देशाच्या राष्ट्रपतींची इच्छा होती, तेव्हा तुम्हाला माहितीय भारताने काय केलं?. भारताने आपली ताकद दाखवली नाही. उलट मालदीवच्या सरकारला या चर्चा करु असं म्हटलं. महासत्ता म्हणून हे जबाबदारीच लक्षण आहे. दादागिरी केली नाही” अशा शब्दात नशीद यांनी भारताच कौतुक केलं.