जगात आर्थिक मंदी सुरु आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने विकासित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे. आगामी काळात भारताचा विकास दर चांगला राहणार आहे. भारताने आता नवीन विक्रम केला आहे. चीन, फ्रान्स यासारख्या देशांना मागे टाकून भारताने हा विक्रम केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या माहितीनुसार विदेशातून देशात सर्वाधिक पैसा भारतीय लोकांनी पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतर्गत ‘इंटरनॅशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन’ (IOM) ही संस्था काम करते. या संस्थेने ‘वर्ल्ड माइग्रेशन रिपोर्ट-2024’ दिला आहे. त्या अहवालानुसार, 2022 मध्ये विदेशात काम करणाऱ्या लोकांची माहिती दिली आहे. विदेशात काम करणारे लोक आपल्या देशात किती पैसा पाठवतात, हे सांगितले आहे.
‘वर्ल्ड माइग्रेशन रिपोर्ट-2024’ नुसार 2022 मध्ये 111 अब्ज डॉलरची रक्कम विदेशातील भारतीयांनी भारतात पाठवली. एकाच वर्षात 100 अब्ज डॉलरापेक्षा जास्त पैसे पाठवणारा भारत हा एकमेव देश आहे. यापूर्वी अनेक वर्ष चीन लोक अव्वल होते. परंतु त्यांच्याकडून कधी एका वर्षात 100 अब्ज डॉलर विदेशातून आपल्या देशात पाठवण्यात आले नाही.
भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे. त्या देशातील विदेशातील लोकांनी 2022 मध्ये पैसा पाठवला आहे. त्यानंतर चीन तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. आपले शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश पहिल्या दहा क्रमांकात नाही. 2022 विदेशातील पाकिस्तानी लोकांनी 30 अब्ज डॉलर पाठवले तर विदेशात राहणाऱ्या बांगलादेशातील लोकांनी 21.5 अब्ज डॉलर पाठवले. विदेशातील भारतीय लोकांनी केलेल्या या कामगिरीमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने विकसित होऊ लागली आहे.