नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामध्ये मागच्या काही वर्षांपासून संबंध बिघडत चालले होते. राजकीय लढाईनंतर दोन्ही देशात आता इकोनॉमिक वॉर सुरु झालय. ज्याचा परिणाम कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत होणार आहे. भारत आणि कॅनडामधील वादावर तोडगा निघाण्याऐवजी हा विषय अधिक चिघळत चाललाय. खलिस्तान्यांचा समर्थन करण्यावरुन सुरु झालेला हा वाद आता इकोनॉमीपर्यंत जाऊन पोहोचलाय. भारत आणि कॅनडामध्ये कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत अनेक अब्जाची गुंतवणूक आहे. सर्वाधिक परिणाम एज्युकेशन सेक्टरवर होऊ शकतो. भारतातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात. बिघडलेल्या राजकीय संबंधांचा सर्वाधिक परिणाम याच क्षेत्रावर होऊ शकतो. भारत-कॅनडात कुठल्या गोष्टींवर देवाण-घेवाण होते, भारतावर कितपत परिणाम होईल, जाणून घेऊया.
वर्ष 2022 मध्ये भारत कॅनडाचा 10 वा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर होता. 2022-23 आर्थिक वर्षात भारताने कॅनडाला 4.10 अब्ज डॉलरच्या सामानाची निर्यात केली. त्याचवर्षी कॅनडाने भारताला 4.05 अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. दोन्ही देशातील व्यापार बरोबरीचा आहे. याआधी 2021-22 मध्ये भारताने कॅनडाला 3.76 अब्ज डॉलरची निर्यात केली. तेच 2021-22 मध्ये आयातीचा आकडा 3.13 अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशात 2021-22 मध्ये द्विपक्षीय व्यापार सात अब्ज डॉलरचा होता. 2022-23 मध्ये त्यात वाढ होऊन हा व्यापार 8.16 अब्ज डॉलरचा झाला.
एका विद्यार्थ्याच्या Fee चा खर्च किती लाख?
भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी पसंती कॅनडाला आहे. कॅनडामध्ये 40 टक्के परदेशी विद्यार्थी आहेत. कॅनडा आणि भारताच्या संबंधात तणाव सतत वाढत चालला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी कॅनडामध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. पंजाबमधून बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात. कॅनडामध्ये सध्या पंजाबचे दोन लाख विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. एका विद्यार्थ्याच्या फी चा 25 लाख रुपये खर्च होतो. तणाव आणखी वाढल्यास कॅनडा आपल्या देशातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करेल. पण त्यामुळे त्यांना फी च्या रक्केमवर पाणी सोडावं लागेल.