नवी दिल्ली : भारताच चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांबरोबर फारस सख्य नाहीय. हे दोन्ही देश नेहमीच भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे आज जगातील अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. देश पातळीवर व्यापार, सहकार्य या माध्यमातून हे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्याचवेळी जगात असाही एक देश आहे, ज्यांच्याबरोबर भारताचे संबंध खराब होतायत. कारण हा देश सातत्याने भारतविरोधी शक्तींना खतपाणी घालतोय. त्यामुळे भारत सरकारने या देशाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताचे कॅनडा बरोबरचे संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही देशाच्या संबंधात तणाव वाढत चालला आहे. भारत-कॅनडामध्ये व्यापार करार फायनल होणार होता. पण आता हा विषय बाजूला पडण्याची शक्यता आहे. या एग्रीमेंटवर चर्चा करण्यासाठी पुढच्या महिन्यात एक ट्रेड मिशन भारतात येणार होतं.
पण आता जस्टिन ट्रूडो सरकारने या ट्रेड मिशनचा दौरा स्थगित केला आहे. व्यापार मंत्रालयाने कुठलही कारण दिलेलं नाही. भारतही कॅनडासोबत हे ट्रेड एग्रीमेंट करण्यास तयार नाहीय. व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये कॅनडाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘आम्हाला काही मुद्यांवर आक्षेप असून ती गंभीर बाब आहे’ असं पीयूष गोयल म्हणाले. जस्टिन ट्रूडो G20 परिषदेसाठी भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी जस्टिन ट्रूडो यांना कॅनडात सुरु असलेल्या काही गोष्टींवर कारवाई करण्यास सांगितली. दोन्ही देशात राजकीय तणावाला जे कारण आहे, त्यावर कॅनडाने पहिली कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे.
….तरच दोन्ही देश पुढे जाऊ शकतात
ट्रेड एग्रीमेंटवर पुढे जाण्याआधी कॅनडाने एक प्रस्ताव सादर करावा, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. भारताचा कॅनडासोबतचा सर्वात मोठा मुद्दा खलिस्तान समर्थकांचा आहे. कॅनडातील राजकारणी खलिस्तान समर्थकांना खतपाणी घालतात. तिथे त्यांना आश्रय मिळतो. कॅनडातून भारतविरोधी कारवाया चालतात हा आक्षेपाचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळेच भारतीयांच्या मनात कॅनडा आणि जस्टिन ट्रूडो यांच्याबद्दल नाराजी आहे. “‘जियोपॉलिटिकली आणि इकोनॉमिकली’ दोन्ही देश एका लाइनवर असतील, तर पुढे जाता येते” असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले.