Republic Day 2024 | आज कर्तव्य पथावर दिसणार भारताची ताकद, जग करणार सलाम

| Updated on: Jan 26, 2024 | 8:08 AM

Republic Day 2024 | भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिंरगा झेंडा फडकवतील. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे आहेत. फ्रेंच सैनिक सुद्धा परेडमध्ये सहभागी होतील.

Republic Day 2024 | आज कर्तव्य पथावर दिसणार भारताची ताकद, जग करणार सलाम
Republic Day 2024
Follow us on

Republic Day 2024 | भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सगळ्यांची नजर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावर आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताची सैन्य शक्ती आणि सांस्कृतीक विविधतेच प्रदर्शन केलं जाईल. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड आणि नागरिक सुरक्षा सेवेच्या एकूण 1,132 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान लागू झालं.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पथावर दिवसेंदिवस सशक्त होत जाणारी भारताची सैन्य शक्ती दिसून येईल. त्याशिवाय देशाच्या विविध राज्यातील सांस्कृतीक विविधता सुद्धा पहायला मिळेल. परेडमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनासह विविध राज्यांचे चित्ररथ सुद्धा पहायला मिळतील. कार्यक्रमाच्या अखेरीस इंडियन एअर फोर्सची फायटर विमान आणि हेलिकॉप्टर्स फ्लाय पास्ट करतील.

जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

उत्तर पूर्वेकडून 45 मुलीच NCC पथक पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परडेमध्ये सहभागी होत आहे. या मुलींच वय 13 ते 15 वर्ष आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील सांस्कृतीक वारशाच या मुली प्रतिनिधीत्व करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. दिल्लीच्या सर्व सीमा परेड संपेपर्यंत सील करण्यात येतील.


जमिनीवर सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिट्रीचे सशस्त्र जवान तैनात आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी मार्गावर बॅरिकेडींग केली असून प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या कार्सची कसून तपासणी केली जात आहे. कर्तव्य पथावर 10.30 वाजता संचलनाला सुरुवात होईल. सुरक्षेसाठी 8 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.