नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या 12 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना (Corona) रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत देशात 12,781 रुग्णांचं निदान झालं आहे. तर 18 कोरोना रुग्णांचा बळी देलाय. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,33,09,473 वर पोहोचली असून मृतांचा आकडा आता 5,24,873 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) याबाबतची आकडेवारी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णावाढीचा धोका पुन्हा वाढतोय. सातत्यानं रुग्णवाढीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.
Single-day rise of 12,781 COVID-19 cases, 18 fatalities pushes India’s tally to 4,33,09,473, death toll to 5,24,873: Union health ministry
हे सुद्धा वाचा— Press Trust of India (@PTI_News) June 20, 2022
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले जातेय. देशातच नव्हे तर मुंबई (Mumbai) ठाण्यासह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं जातंय. देशातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या धडकी भरवणारीच आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बीएमसीने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 2087 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
#CoronavirusUpdates
19th June, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 2087
Discharged Pts. (24 hrs) – 1802Total Recovered Pts. – 10,61,164
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 13897
Doubling Rate – 381 Days
Growth Rate (12th June- 18th June)- 0.178%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 19, 2022
चीनमध्ये 19 जून रोजी 109 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. त्यापैकी 38 लक्षणे नसलेले आणि 71 लक्षणे असलेले रूग्ण आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी दिलीये. भारतामधील कोरोना रूग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या असतील तर बुस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर देखील भर देणे महत्वाचे आहे.