भारताच्या मागणीपुढे जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश झुकला, पाकिस्तानला बसला झटका

| Updated on: Jan 13, 2025 | 4:25 PM

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना आमंत्रित करून भारताने एका दगडात अनेक पक्षी मारले आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंडोनेशियाची भारताशी चांगली मैत्री आहे. यामुळे १९५० नंतर चौथ्यांदा इंडोनेशियन नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.

भारताच्या मागणीपुढे जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश झुकला, पाकिस्तानला बसला झटका
नरेंद्र मोदींसोबत इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटो
Follow us on

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुवियांटो या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रपती सुवियांटो या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. स्वातंत्र्यानंतर चौथ्यांदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी येत आहे. भारताच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्याची इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीची परंपरा सुवियांटो यांनी खंडीत केली आहे. मोदी सरकारची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तान दौरा टाळला आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे. कारण इंडोनेशिया राष्ट्रपतीबरोबर भारत विरोधी सूर काढण्याची तयारी पाकिस्तानने सुरु केली होती.

भारत प्रजासत्ताक दिनी दरवर्षी कोणत्यातरी एका देशाच्या प्रमुखाला आमंत्रित करतो. २०२४ मध्ये फ्रॉन्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. २०२३ मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल आले होते. आता २०२५ मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटो प्रमुख अतिथी म्हणून येत आहे. यामुळे दोन्ही देशांचे नाते अधिकच दृढ होणार आहे.

भारताने वेगळे धोरण करण्यास भाग पाडले

भारत नवी दिल्लीत येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या पाकिस्तान दौरा करण्यास विरोध करत असतो. त्याला डी-हायफनेशन धोरण म्हणून पाहिले जाते. भारताने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डब्ल्यू बूश प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळापासून हे धोरण सुरु केले. अमेरिकेने भारतासंदर्भात वेगळे परराष्ट्र धोरण ठेवावे आणि पाकिस्तान संदर्भात वेगळे धोरण ठेवावे, अशी भारताची अपेक्षा आहे. या धोरणामुळे २०१९ मध्ये सौदी अरेबियाचे काऊन प्रिन्ट बिन सलमान अल सऊद यांना एका महिन्यात दोन वेगवेगळे पाकिस्तान-भारत दौरे करावे लागले आहे. जगभरात भारताची शक्ती वाढत असल्यामुळे सर्वच देश आता भारतासंदर्भात आपली स्पष्ट वेगळी भूमिका घेऊ लागले आहे.

हे सुद्धा वाचा

भारताची अशी आहे रणनीती

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना आमंत्रित करून भारताने एका दगडात अनेक पक्षी मारले आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंडोनेशियाची भारताशी चांगली मैत्री आहे. यामुळे १९५० नंतर चौथ्यांदा इंडोनेशियन नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. दुसरे म्हणजे इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. तो दक्षिण चीन समुद्रात मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. इंडोनेशिया आसियानचा प्रमुख देश आहे. त्यामुळे भारताचे महत्व पूर्व आशियात वाढत आहे.