मालदीवचं डोकं आलं ठिकाण्यावर, पाहा कोण येतंय भारत दौऱ्यावर

| Updated on: May 07, 2024 | 9:12 PM

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध ताणले जात असतानाच आता मालदीवमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू सत्तेत आल्यानंतर त्यांनी चीनचा पहिला अधिकृत दौरा केला होता. पण भारताने देखील आक्रमक भूमिका घेतल्याने मालदीवचे डोकं ठिकाण्यावर आलेले दिसत आहे.

मालदीवचं डोकं आलं ठिकाण्यावर, पाहा कोण येतंय भारत दौऱ्यावर
Follow us on

India-Maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले असतानाच आता मालदीवने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक नेता सत्तेवर आल्यावर सतत भारत विरोधी वक्तव्य आणि भूमिका घेतल्या जात आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. चीनच्या जवळ गेल्यास आपल्याला भारताची गरज राहणार नाही असा त्यांचा समज आहे. पण त्यांचा हा समज एकेदिवशी त्यांच्यासाठीच मोठा धक्का देणारा ठरु शकतो. भारताने मालदीववर बहिष्कार टाकल्याने गेल्या चार महिन्यात भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी भारतीय पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. कारण यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

मालदीवचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर

दुसरीकडे आता मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर भारत दौऱ्यावर येणार आहेत. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांनी 8 ते 10 मे या कालावधीत भारताच्या अधिकृत भेटीची घोषणा केली आहे. असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘परराष्ट्र मंत्री मुसा जमीर गे नवी दिल्ली भेटीदरम्यान, परस्पर हितसंबंधांच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत’ प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात (IOR) भारताचा प्रमुख सागरी शेजारी आहे आणि परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्याला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

एस जयशंकर यांची घेणार भेट

मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मालदीवचे मंत्री परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील आणि भारत-मालदीवमधील दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा करतील. “परराष्ट्र मंत्री मुसा जमीर 8 ते 10 मे 2024 या कालावधीत भारताला अधिकृत भेट देतील,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर हे मुइज्जू हे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृत भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. जमीर हे 8 ते 10 मे या कालावधीत भारत दौऱ्यावर येतील. या दरम्यानच मालदीव सरकारने भारताला आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.

भारत आणि मालदीव यांनी द्विपक्षीय उच्च-स्तरीय कोर गटाची बैठक देखील याआधी झालीये. 10 मे पर्यंत मालदीवमधून भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना भारतात माघारी पाठवण्याच्या सूचना मुइज्जू यांनी केल्या आहेत. भारताने लष्करी कर्मचाऱ्यांच्या बदल्यात अभियांत्रिकी गट मालदीवमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता.