India-Maldive Row : भारत मालदीव तणाव: भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. मालदीव सध्या भारताच्या विरोधात निर्णय घेतांना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना मोहम्मद मुइज्जू सतत भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. भारतीय जवानही आता तेथून परतणार आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना विशेष संदेश पाठवला. पंतप्रधान मोदींनी मुइज्जू सरकार आणि देशवासियांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक आणि सभ्यता संबंधांचा उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण ईद-उल-फित्र पारंपारिक उत्साहाने साजरी करत असताना जगभरातील लोक करुणा, बंधुता आणि एकता या मूल्यांचे स्मरण करत आहेत, जे शांततामय आणि सर्वसमावेशक जगाच्या उभारणीसाठी आवश्यक आहेत. हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी यांनी मुईज्जू यांना शुभेच्छा दिल्या. ज्यांना चीन समर्थक नेता म्हटले जाते, त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांगितले भारतीय जवानांना माघारी पाठवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
अलीकडेच, भारताने मालदीवला अंडी, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळी यासारख्या काही वस्तूंच्या निर्यात यावर्षीही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे आभार मानले होते.
2024-25 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत मालदीवमध्ये या वस्तूंची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे होती. ज्यामध्ये अंडी, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, कडधान्ये आणि नदीची वाळू मालदीवमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी शनिवारी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. हा निर्णय दीर्घकालीन द्विपक्षीय मैत्री आणि व्यापार आणि वाणिज्य वाढवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले होते.