India maldive Row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला मोठा झटका

| Updated on: Mar 05, 2024 | 4:49 PM

India maldives Row: भारत आणि मालदीव यांच्यात दरी निर्माण करण्यात चीनला यश आले आहे. भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध आता सामान्य राहिलेले नाही. चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांनी चीनच्या पाठिंब्याने भारताचं अस्तित्व आपल्या देशातून काढण्याचा निश्चय केलेला दिसतो आहे.

India maldive Row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला मोठा झटका
Follow us on

India maldive Row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 10 मे नंतर एकही भारतीय लष्करी कर्मचारी आपल्या देशात उपस्थित राहणार नाही, अगदी साध्या कपड्यांमध्येही नाही. मुइज्जूचे यांचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे जेव्हा काही काळापूर्वी भारतातील एक नागरी पथक विमानचालन प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी मालदीवमध्ये पोहोचले होते.

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय लष्करी जवानांच्या पहिल्या गटाला देशातून परतण्यासाठी 10 मार्च 2024 ही अंतिम मुदत दिली होती. आता मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी किबा बेटावरील इधाफुशी निवासी समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारतीय सैन्याला देशातून बाहेर काढण्यात त्यांच्या सरकारला यश आल्याने खोट्या अफवा पसरवणारे लोक परिस्थितीचा विपर्यास करत आहेत. ते म्हणाले की, “हे लोक (भारतीय सैन्य) देश सोडत नाहीत हे सांगण्यासाठी, ते त्यांचे गणवेश बदलून साधे कपडे घालून परतत आहेत. आपल्या मनात शंका निर्माण करणारे आणि खोटेपणा पसरवणारे विचार आपण पुढे आणू नयेत.”

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, “१० मे नंतर एकही भारतीय सैनिक देशात उपस्थित राहणार नाही. ना गणवेशात ना साध्या कपड्यात. भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या पोशाखात या देशात राहणार नाही. मी हे आत्मविश्वासाने सांगतो.” त्यांनी हे विधान तेव्हा केले आहे जेव्हा मालदीवने चीनशी मोफत लष्करी मदत मिळवण्याचा करार केला आहे.

2 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे झालेल्या दोन्ही बाजूंच्या उच्चस्तरीय बैठकीत मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की भारत तीन विमानचालन प्लॅटफॉर्मवर आपल्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी टेक्निकल टीम जे भारतीय कर्मचारी असतील त्यांना रिप्लेस करेल. पण मुईज्जू यांनी 5 फेब्रुवारी रोजी संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या.

सध्या 88 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत, जे प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवतात. याद्वारे त्यांनी शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिमे पूर्ण केली आहेत. देश सोडणारे पहिले लष्करी कर्मचारी हे Addu शहरात दोन हेलिकॉप्टर चालवणारे भारतीय लष्करी कर्मचारी होते. आता १० मे पर्यंत सर्व कर्मचारी भारतात परत जातील असं त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, मालदीवने गेल्या आठवड्यात वैद्यकीय बचाव मोहिमेसाठी विमाने चालवण्यासाठी श्रीलंकेसोबत यशस्वीपणे करार केला आहे. यावरून तो सर्व भारतीय सैनिकांना हटवण्याच्या बेतात आहे.