Gold in India: जगात कोणत्या देशाकडे किती सोने, भारताच्या तिजोरीत किती आहे सोने

| Updated on: Jun 02, 2024 | 10:01 AM

RBI Gold: वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 पहिल्या तिमाहीत भारताजवळ जवळपास 800 टन सोने होते. त्यातील 500 टन विदेशात तर 300 टन भारतात आहे. आता आरबीआय 100 टन सोने देशात आणत आहे,.

Gold in India: जगात कोणत्या देशाकडे किती सोने, भारताच्या तिजोरीत किती आहे सोने
सोने आले मायदेशी
Follow us on

RBI Gold: भारतीय रिझर्व्ह बँक अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये असलेले सोने भारतात आणणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ब्रिटनमध्ये ठेवलेले 100 टन सोने भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 1991 प्रथमच देशातील सोन्याच्या भंडारात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे सकारात्मक लक्षण आहे. 26 एप्रिल 2024 पर्यंत आरबीआयकडे 827.69 टन सोने होते. तसेच आरबीआयकडे असणाऱ्या सोन्यातील जवळपास 413.8 टन सोने विदेशात ठेवण्यात आले आहे. आता हे सोने हळहळू भारतात आणले जात आहेत.

100 टन सोने आणणार

देशात आता परिस्थिती बदलत आहेत. अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत आहे. कधीकाळी देशातील सोने विदेशात ठेवण्याच्या बातम्या येत होत्या. आता विदेशातील सोने भारतात आणले जात आहेत. “टाइम्‍स ऑफ इंडिया” मधील बातमीनुसार, आरबीआय अधिकाऱ्यांना ब्रिटनमधील 100 टन सोने येत्या काही दिवसांत भारतात आणले जाणार आहे. भविष्यातील आर्थिक स्थिरता त्यामुळे निर्माण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारत नवव्या क्रमांकावर

वर्ल्ड गोल्ड काउंसिल (World Gold Council) च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 पहिल्या तिमाहीत भारताजवळ जवळपास 800 टन सोने होते. त्यातील 500 टन विदेशात तर 300 टन भारतात आहे. आता आरबीआय 100 टन सोने देशात आणत असल्यामुळे देशात आणि विदेशातील आकडे 50-50 टक्के होणार आहे. जगात सर्वात जास्त सोने अमेरिकेकडे आहे. अमेरिकेचा गोल्ड रिझर्व्ह जवळपास 8133 टन आहे. जगात सर्वाधिक सोने असल्याच्या यादीत भारत 9 व्या क्रमांकावर आहे. भारताजवळ सध्या 822 टन सोने आहे. आरबीआय सातत्याने सोने घेत आहे. यामुळे जपानला सोडून भारत लवकरच 8 व्या क्रमांकावर येणार आहे. जपानजवळ सध्या 845 टन सोने आहे.

कोणत्या देशाकडे किती आहे सोने

  1. अमेरिका – 8,133.46 टन (579,050.15 मिलियन डॉलर)
  2. जर्मनी – 3,352.65 टन (238,662.64 मिलियन डॉलर)
  3. इटली – 2,451.84 टन (174,555.00 मिलियन डॉलर)
  4. फ्रॉन्स – 2,436.88 टन (173,492.11 मिलियन डॉलर)
  5. रूस – 2,332.74 टन (166,076.25 मिलियन डॉलर)
  6. चीन – 2,262.45 टन (161,071.82 मिलियन डॉलर)
  7. स्वित्झर्लंड – 1,040.00 टन (69,495.46 मिलियन डॉलर)
  8. जपान – 845.97 टन (60,227.84 मिलियन डॉलर)
  9. भारत – 822.09 टन (58,527.34 मिलियन डॉलर)
  10. नीदरलँड – 612.45 टन (43,602.77 मिलियन डॉलर)