देशात पुन्हा कोरोनाचा कहर वाढला; 24 तासात 8,822 नवीन रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 15, 2022 | 5:08 PM

गेल्या 24 तासात देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 5,24,792 वर गेली आहे.

देशात पुन्हा कोरोनाचा कहर वाढला; 24 तासात 8,822 नवीन रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
कोरोना
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 8,822 नवीन रुग्ण (New Patient) आढळले आहेत. एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी देशभरात कोरोनाचे 6,594 रुग्ण आढळले होते. अशाप्रकारे मंगळवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता संक्रमित लोकांची संख्या 4,32,45,517 झाली आहे. बुधवारी आपली आकडेवारी जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) सांगितले की, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,637 वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या 24 तासात देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 5,24,792 वर गेली आहे.

देशभरात 15 जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 15 जणांपैकी 7 केरळ, 2 दिल्ली, 4 महाराष्ट्र आणि 1 राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रातून 1,47,875, केरळमधून 69,842, कर्नाटकातून 40,108, तामिळनाडूमधून 38,025, दिल्लीतून 26,223, उत्तर प्रदेशातून 23,525 आणि पश्चिम बंगालमधून 21,206 मृत्यू झाले आहेत. आकडेवारीनुसार, पॉझिटीव्हीटी दर हा 2 टक्क्यांवर पोहचला आहे, तर आठवडी पॉझिटीव्हीटी दर हा 2.35 टक्के आहे. त्याच वेळी, लसीकरणाविषयी बोलताना, मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 195.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान काल म्हणजे मंगळवारी मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढल्याचे समोर आले होते. मंगळवारी 1,724 एकट्या मुंबईत वाढले होते. तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 600 रूग्ण अधिक वाढले होते. मुंबईच कोरोनाचे रूग्ण हे आतापर्यंत 10,83,589 झाले असून कोरोनाने मृत होणाऱ्या लोकांची संख्याही 19,575 गेली आहे. त्यामुळे वेळोवेळी राज्य शासनाकडून मास्क वापरण्याबाबत सुचना केल्या जात आहेत.