भारताची चाल, मालदीव ठिकाणावर, आता मालदीवने म्हटले, धन्यवाद भारत

| Updated on: Apr 07, 2024 | 9:36 AM

India-Maldives Relations: मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताविरोधी धोरण घेत चीनला पाठिंबा देण्याचे काम सुरु केले होते. त्यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य माघारी बोलवण्याचे म्हटले होते. त्यानंतर चीनसोबत सैन्य करारही केला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून तणाव होता.

भारताची चाल, मालदीव ठिकाणावर, आता मालदीवने म्हटले, धन्यवाद भारत
Mohamed Muizzu and narendra modi
Follow us on

भारताशी पंगा घेणारा मालदीव आता ठिकाणावर आला आहे. इंडिया आऊटचे नारे देणारे मालदीवमधील नवीन सरकार आता भारताचे आभार मानत आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी चीनसाठी भारताशी पंगा घेतला होता. परंतु भारताशी पंगा महाग पडणार, हे लक्षात येताच मालदीवने भूमिका बदलली. दोन्ही देशांमधील वाद सुरु असताना भारताने मालदीवला मदत केली. त्यामुळे मालदीवचे परराष्ट्रमंत्री मूसा जमीर भरावले आहे. त्यांनी भारत सरकार आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे आभार मानले आहे. भारताने मालदीवसाठी निर्यातीवरील प्रतिबंध हटवत साखर, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळ यासारख्या वस्तू निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे 1981 नंतर ही सर्वात मोठी निर्यात असणार आहे.

भारताचे मानले आभार

भारत मालदीवला आता 124,218 टन तांदूळ, 109,162 टन गव्हाचे पीठ, 64,494 साखर, 21,513 टन बटाचे, 35,749 कांदा, 42.75 कोटी अंडे देणार आहे. भारताच्या या उदारतेबद्दल मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हे आमच्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीचे तसेच द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्य आणखी वाढविण्याच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

हे सुद्धा वाचा

भारताने दिली प्रतिक्रिया

मालदीवच्या परराष्ट्रमंत्री मुसा जमीर यांच्या ट्विटवर भारताने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या नेबरहुड फर्स्ट आणि सागर धोरणांसाठी कटिबद्ध आहे. सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास हे भारताचे धोरण आहे. महासागर क्षेत्रातील सागरी सहकार्याचे भारताचे धोरण आहे.

मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताविरोधी धोरण घेत चीनला पाठिंबा देण्याचे काम सुरु केले होते. त्यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य माघारी बोलवण्याचे म्हटले होते. त्यानंतर चीनसोबत सैन्य करारही केला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून तणाव होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. तसेच लक्षद्वीपचे फोटो ट्विट करत पर्यटकांना भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मालदीवला अधिक मिरच्या झोंबल्या होत्या. मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. अखेर त्या मंत्र्यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली होती.