India vs Bharat | ‘जिन्ना पण इंडियाच्या…’ काँग्रेस नेत्याने भाजपाला असं घेरलं, देशाच नाव बदलण्याचा वाद

| Updated on: Sep 06, 2023 | 8:11 AM

India vs Bharat देशाच नाव बदलण्यावरुन सुरु असलेल्या वादात काँग्रेसने मोहम्मद अली जिन्नांचा दाखला दिला आहे. जी-20 च्या परिषदेसाठी निमंत्रण पत्र पाठवलं आहे, त्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिलं आहे, त्यावरुन हा वाद सुरु झालाय.

India vs Bharat | जिन्ना पण इंडियाच्या... काँग्रेस नेत्याने भाजपाला असं घेरलं, देशाच नाव बदलण्याचा वाद
Pakistani founder muhammad ali jinnah
Follow us on

नवी दिल्ली : इंडिया आणि भारत या नावावरुन राजकीय लढाई आणखी तीव्र होत चालली आहे. G-20 शिखर सम्मेलनाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत, प्राइम मिनिस्टर ऑफ भारत लिहिलं जातय. सरकारची पावलं कुठल्या दिशेने पडतायत हे त्यावरुन स्पष्ट होतं. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोहम्मद अली जिन्ना सुद्धा इंडियाचा विरोध करायचे असं थरुर यांनी म्हटलं आहे. “इंडियाला भारत म्हणण्यात काही संवैधानिक अडचण नाहीय. पण इंडिया नावाचा पूर्णपणे बहिष्कार करण्याचा मूर्खपणा सरकार नक्कीच करणार नाही. कारण त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू संपून जाईल” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

“पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी इंडिया नावावर आक्षेप घेतला होता. आपला देश ब्रिटिश राजचा उत्तराधिकारी आहे आणि पाकिस्तान एक वेगळं राष्ट्र आहे, असं जिन्ना यांचं मत होतं” असं थरुर यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. “CAA प्रमाणे भाजपा इथे सुद्धा जिन्नांच्या विचारांच समर्थन करतेय” असं काँग्रेस खासदाराने लिहिलं आहे. फक्त शशी थरुरच नाही, काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी सुद्धा भाजपाच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपा इंडिया नावाला घाबरते, त्यामुळे त्यांनी भारत नावाची चर्चा सुरु केलीय, असं काँग्रेस नेत्यांच म्हणणं आहे.


संविधानाच्या कुठल्या आर्टिकलमध्ये बदल करावा लागेल?

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच विशेष सत्र बोलावल आहे. या दरम्यान अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. या दरम्यानच मोदी सरकार संविधानाच्या आर्टिकल 1 मध्ये लिहिलेला इंडिया शब्द पूर्णपणे हटवून भारत हे नाव कायम करेल. असं केल्यास प्रत्येक ठिकाणी इंडियाच्या जागी देशाच नाव भारत होईल. सरकारने जी-20 च्या परिषदेसाठी निमंत्रण पत्र पाठवलं आहे, त्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिलं आहे, त्यावरुन हे संकेत मिळत आहेत. काँग्रेससह जे विरोधी पक्ष यावर आक्षेप घेतायत, त्यावर भाजपाने ‘भारत’ शब्दावर अडचण काय आहे, असा सवाल केलाय.