एक काळ असा होता जेव्हा पाश्चिमात्य देश भारताची खिल्ली उडवायचे. इतकेच नाही तर त्यांना खालच्या दर्जाची वागणूक द्यायचे. त्यांना भारताकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. भारत हा केवळ गरिबांचा देश असल्याचं ते म्हणायचे. पण गेल्या काही वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आता सारे जग भारताकडे आशेने पाहत आहे. याचे उदाहरण अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने 2014 मध्ये मांडले होते. जेव्हा त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची खिल्ली उडवली. यामुळे वृत्तपत्राने माफीही देखील मागितली होती. पण आता परिस्थिती अशी आहे की, इस्रोने एकामागून एक अशा यशस्वी मोहिमा करत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला भारताकडे आपलं यान पाठवण्यासाठी यावं लागत आहे. इस्रो आता युरोपियन युनियनचे उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, भारत पुढील महिन्याच्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा-3 हे यान प्रक्षेपित करेल. मोहिमेअंतर्गत दोन उपग्रह पाठवण्यात येतील. जे मंगळवारी सकाळी श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) जवळ आणण्यात आले. हे उपग्रह सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येत आहेत.
“युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा-3 ही मोहीम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे ते प्रक्षेपित केले जातील.” Proba-3 चे दोन उपग्रह PSLV-XL प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी प्रक्षेपित केले जातील. प्रोबा-3 चे दोन उपग्रह सूर्याभोवतीच्या वातावरणाचे दृश्य प्रदान करण्यास सक्षम असतील, जे पूर्वी सूर्यग्रहणाच्या वेळी काही क्षणांसाठी पृथ्वीवरून दृश्यमान होते.
न्यूयॉर्क टाइम्सच्या व्यंगचित्रात भारताची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र छापण्यात आले होते. ज्यामध्ये एक शेतकरी बैलासह मंगळावर पोहोचतो आणि एका खोलीचा दरवाजा ठोठावत आहे, जिथे विकसित म्हणजेच पाश्चात्य देशांतील तीन-चार वैज्ञानिक आत बसले आहेत. त्यांच्या गेटवर ‘एलिट स्पेस क्लब’ असे लिहिले आहे. मात्र, वृत्तपत्राला जेव्हा भारताची ताकद कळाली. लोकांनी जेव्हा त्यांच्या या कृतीचा निषेध केला तेव्हा या वृतपत्राला माफी मागावी लागली. ‘आमच्या या व्यंगचित्रावर अनेक वाचकांनी तक्रारी पाठवल्या आहेत. मात्र, मंगळावर केवळ श्रीमंत, विकसित देशांनाच प्रवेश नाही तर आता विकसनशील देशही मंगळावर पोहोचत आहेत, हे दाखवणे हा व्यंगचित्रकाराचा उद्देश होता.
This cartoon published by NYT is certainly racist.
But let’s not take offence!
Yes, we are proud to be a land of snake charmers, cows & gurus. Also, we can land on the moon.
We as Indians shld shrug off Western standards of ‘elite’ & ‘developed’. We don’t need their… pic.twitter.com/im5Fp5EN3Y
— Manuj Jindal (@manujjindalIAS) August 24, 2023
मात्र, तीन वर्षांनंतर भारताचे एक व्यंगचित्र समोर आले आहे. जे जवळपास NYT च्या मागील व्यंगचित्रासारखेच होते परंतु मागील व्यंगचित्रात दाखवलेल्या एलिट स्पेस क्लबच्या आत भारतीय शेतकरी आपल्या बैलासोबत बसला होता आणि त्याच्या दाराबाहेर मागील व्यंगचित्रात दाखवलेल्या एलिट स्पेस क्लबचे शास्त्रज्ञ त्यांचे उपग्रह घेऊन उभे आहेत. हे दुसरे व्यंगचित्र तेव्हा आले जेव्हा इस्रोने 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम केला होता. हे व्यंगचित्र TOI ने बनवले होते.