जम्मू : कडाक्याच्या थंडीत भारतीय जवानांनी एका गदोदर महिलेसाठी जे केलं, त्याचं कौतुक सर्वच थरातून होतंय. शनिवारी एलओसी जवळील भागात भारतीय सैन्यातील जवानांनी एका गरोदर महिलेला 6 किलोमीटर दूर चालत आपल्या खांद्यावर उचलून रुग्णालयात नेलं. याबाबतचा व्हिडीओही समोर आला आहे.
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी एलओसीजवळ राहत असलेल्या एका गरोदर महिलेची प्रकृती खालावली होती. घग्गर हिल गावात राहणारी ही महिला गरोदर असल्यानं तिची प्रकृती अधिकच ढासळू लागलू होती. प्रचंड बर्फवृष्टीमुळे आणि गोठवणाऱ्या थंडीत वाहनंही उपलब्ध नसल्यानं आता करायचं काय, असा प्रश्न या महिलेला पडला होता. आधीच पारा घसरला होता. त्यात तुफान बर्फवृष्टी सुरु होती. जवळपास कोणतंही वाहन मिळण्याचीही शक्यता नव्हती. अशावेळी आता आपलं काय होणार, असा प्रश्न या गरोदर महिलेसह तिच्या कुटुंबीयांना पडला होता.
दरम्यान, याबाबतची माहिती जेव्हा सीमाभागातील जवानांना समजली, तेव्हा त्यांनी या महिलेला आपल्या खांद्यावर उचलून सहा किलोमीटर बर्फातून प्रवास केला आणि रुग्णालयात पोहोचवलं.
दरम्यान, पायी रुग्णालयात पोहोचवलेल्या या महिलेला वेळीच उपचार मिळाले. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनीही जवानांचे मनापासून आभार मानलेत. अत्यंत वेगान यावेळी बर्फवृष्टी होत होती. मात्र तुफान बर्फवृष्टीची पर्वा न करता जवानांनी चोख कामगिरी बजावत पहिलेला पायीच बर्फातून रुग्णालयात पोहोचवलं. योग्यवेळी ही जवानांनी केलेली मदत या महिलेला मिळाली नसती, तर कदाचित अनर्थ घडला असता.
मात्र सुदैवानं या महिलेच्या मदतीसाठी जवान धावून आले आणि या महिलेला रुग्णालयात पोहोचून योग्य ते उपचार मिळाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जवानांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना कडक सॅल्यूट अनेकांनी आपल्या कमेंटमधून दिला आहे.
#WATCH | Amid heavy snowfall, Indian Army medical team conducted an emergency evacuation of a pregnant woman from Ghaggar Hill village near LOC and brought her to an ambulance at Salasan in Baramulla, Jammu & Kashmir. pic.twitter.com/jAUsnnawDd
— ANI (@ANI) January 8, 2022