Indian Army : देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना जवानांची अनोखी आदरांजली, बाईक रॅलीच्या माध्यामातून सलामी

| Updated on: Jul 24, 2022 | 3:54 PM

Galwan Valley : देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना जवानांची अनोखी आदरांजली

Indian Army : देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना जवानांची अनोखी आदरांजली, बाईक रॅलीच्या माध्यामातून सलामी
Follow us on

लडाख : भारतीय जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात. अनेकदा या जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. तरी ते देशावरच्या प्रेमाखातर मागे-पुढे पाहात नाहीत. या जवानांप्रती विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते. आताही या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. भारतीय लष्कराच्या (Indian Army) नॉर्दर्न कमांडकडून या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.यात सहभागींनी झालेल्या जवानांनी गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) शूरवीरांना आदरांजली वाहिली आहे. त्यासाठी त्यांनी लडाखच्या खडतर रस्त्यांवरून प्रवास करत नुब्रा व्हॅलीपर्यंतचा प्रवास केला.