अहमदाबाद : एका दीड वर्षाच्या बाळाला वाचवण्यात सैन्याला (Indian Army) यश आलंय. हे बाळ तब्बल तीनशे फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडलं होतं. या बाळाला (Small kid rescued) वाचवण्यासाठी सैन्यानं विशेष मोहीम राबवली आणि या बाळाला सुखरुप बाहेर (Survived) काढण्यात आलं. सध्या या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. ही घटना बुधवारी घडली. अहमदाबादच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दुदापूर गावात दीड वर्षाचं हे बाळ बोअरवेलच्या खड्ड्यामध्ये पडलं होतं. पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण या बाळाच्या बाबतीत खरी ठरलीय. या दीड वर्षांच्या बाळाचं नाहे शिवम! बोअरवेलसाठी खणण्यात आलेला तीनशे फुट खोल खड्डा उघडाच ठेवण्यात आला होता. या खड्ड्यात शिवम खेळता खेळता तोल जाऊन पडला आणि खड्ड्यामध्ये अडकला.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धांग्रध्रा येथील दुदापूर गावातील एका शेतात ही घटना घडली. बोअरवेल खणण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी खड्डा खणला होता. या खड्ड्यात शिवम खेळता खेळता पडला. तीनशे फूट खोल खड्ड्यात तो पडला. शिवमेच वडील शेतात काम करत होते. त्यात त्यांना रडण्याचा आवाज ऐकू आला. मुलगा रडतोय, पण कुठे दिसत नाहीये, यामुळे शिवमचे वडील कासावीस झाले. अखेर तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचं कळलं. आता त्याला बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न उपस्थित जाला होता.
अखेर शिवमच्या मातापित्यांनी अग्निशमन दलाला आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतीची याचना केली. त्यानंतर या दोन्ही यंत्रणा चिमुकल्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. घटनेचं गार्भीर्य ओळखून एनडीआरएफचंही पथक तैनात करण्यात आलं. पण अखेरील ध्रांगध्रामध्ये असलेल्या सैन्याच्या जवानांनाही घटनास्थळी पाठवण्यात आलं. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं.
300 फूट खोल खड्ड्यात 25 फुटांवर शिवम अडकला होता. पाण्याता स्तर त्याच्या नाकातोंडापर्यंत पोहोचला होता. पण त्याच्या रडण्याच्या आवाजानं तो आहे, हे जवानांना कळून येत होते. यानंतर सैन्यदलाचा एक दोरखंड आत खड्ड्यात सोडला. या दोरखंडाला एक हुक लावण्यात आला होता. हा हुक चिमुरड्याच्या शर्टात अडकवण्यात सैन्य दलाच्या जवानांना यश आणि त्यानंतर हळूहळू त्याला वर खेचण्यात आलं.
#WATCH | Indian Army safely rescues 18-month old Shivam who had accidentally fallen into a 300-ft borewell in Dudhapur village located 20 km from Dhrangadhra Taluka of Surendranagar district, Gujarat
(Source: Defence PRO, Gujarat) pic.twitter.com/b58KM4kRCl
— ANI (@ANI) June 8, 2022
जवळपास 40 मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या दीड वर्षांच्या चिमुकल्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. यानंतर आजूबाजूला गोळा झालेल्या गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि सैन्याचे आभारही मानले.
संध्या सात वाजता शिवम खड्ड्यात पडला होता. रात्री साडे दहा वाजता त्याला बाहेर काढण्यात आलं. एकीकडे शुभम खड्ड्यात पडला होता. तर दुसरीकडे गावातील लोकांचा जीव खालीवर होत होता. दरम्यान, मुलाला जिवंत बाहेर काढल्याचं पाहून त्याच्या आई-वडिलांच्या जिवातही जीव आलाय. सध्या शिवमला स्थानिक रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. खबरदारी म्हणून त्याच्यावर डॉक्टरांकडून पाहणी केली जातेय.