नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : पुढील वर्षी भारताचे दोन एस्ट्रोनॉट आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवर जाऊ शकतात. तशी तयारीच इस्रोने सुरू केली आहे. एस्ट्रोनॉटचे नाव फायनल करण्यापूर्वी इस्रोने गगन यान मिशनवर फोकस केला आहे. हे मिशन पुढील वर्षी लॉन्च होणार आहे. विशेष बाब म्हणजे हे इस्रोचे पहिले मानव मिशन असेल. पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर LEO ऑर्बिटपर्यंत जाणार असून अंतराळाची जाऊन एस्ट्रॉनॉट परत घेऊन येणार आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय एस्ट्रॉनॉटला घेऊन जाण्याची जबाबदारी नासाने घेतली आहे. याबाबत नासा आणि इस्रो दरम्यान करारही झाला आहे. नुकतीच जी-20 परिषद झाली. त्यावेळी जो बायडेन भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर व्हाईट हाऊसने संयुक्त निवेदन जारी केलं आहे. नासाकडून ह्यूस्टनमध्ये जॉनसन स्पेस सेंटरमध्ये एस्ट्रोनॉटला प्रशिक्षण देण्याच्या निर्णयाचंही मोदी आणि बायडेन यांनी स्वागत केलं होतं.
अमेरिका, रशिया, जापान आणि यूरोपसहीत 15 देशांच्या स्पेस एजन्सीने मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापना केली होती. अंतरातील अंतरळावीर राहण्याची ही जागा आहे. या ठिकाणी राहून अंतराळवीर अंतराळ विज्ञानशी संबंधित अनेक रहस्य उलगडण्याचं काम करतात. अंतराळात मानवाने राहण्याने काय परिणाम होतो हे पाहणं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. या ठिकाणी दिवस आणि रात्र तसेच गुरुत्वाकर्षण असल्याने अंतराळवीरांच्या शरीरावर बरेच प्रभाव पडतात. त्याचा अभ्यास जगभरातील स्पेस एजन्सी करत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पृथ्वीच्या LEO ऑर्बिटमध्ये आहे. त्यामुळे तो सातत्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतो. विशेष म्हणजे 90 मिनिटात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. म्हणजे या ठिकाणी 90 मिनिटाचा एक दिवस असतो. आणि रात्रही एवढ्याच वेळाची असते. पृथ्वीच्या तुलनेत या ठिकाणी 24 तासात 16 वेळा दिवस आणि रात्र असते. स्पेस स्टेशन एक सेकंदमध्ये पाच मैलपर्यंत प्रवास करतो.
किती मोठा स्पेस स्टेशन
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची लांबी जवळपास 109 मीटर आहे. त्याचे वजन 450 टन आहे. हे स्पेस स्टेशन सौर ऊर्जेने संचलित आहे. विशेष म्हणजे टेलिस्कोपच्याद्वारे पृथ्वीवरूनही पाहता येते. अनेकदा तर स्पेस स्टेशन कुठे आहे याची माहिती नासाकडूनही दिली जाते.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 किमी अंतरावर LEO ऑर्बिटमध्ये आहे. स्पेसशिपपासून इथपर्यंत जाण्यासाठी चार तास लागतात. या ठिकाणी एस्ट्रोनॉटसाठी 6 स्लिपिंग क्वार्टर बनवण्यात आले आहे. बाथरूमही आहे. फक्त एकच खिडकी असून त्यातून बाहेर पाहता येते.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये एकावेळी सात एस्ट्रोनॉट राऊ शकतात. एकदा इथे गेल्यानंतर कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत इथे थांबावं लागतं. त्याची वेळ पूर्ण झाल्यावर दुसरी टीम पाठवली जाते. या अंतराळवीरांसाठी कार्गो फ्लाईटने आवश्यक सामान पाठवलं जातं. स्पेस स्टेशनला एकसाथ 8 क्राफ्ट जोडले जातात.