नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) हे भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय बनावटीच्या कोरोना लसचं कौतुक केलं. (Boris Johnson India Visit) माझ्या हातात कोव्हिड व्हॅक्सीन आहे. या लसने मला बरं केलं. मी भारताचा खूप आभारी आहे, असं बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.. जॉन्सन यांचा आज भारत दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारत आणि ब्रिटनचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. जॉन्सन यांच्या आताच्या भारत भेटीत या संबंधावर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर सह्याही करण्यात आल्या. भारत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. अशावेळी जॉन्सन यांचं भारतात येणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यात शुक्रवारी हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. त्यानंतर मोदी आणि जॉन्सन यांनी संयुक्त निवेदन दिलं. युक्रेनमध्ये त्वरीत शस्त्रसंधी व्हावी. चर्चेतून या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे. सर्व देशात अखंतडता आणि संप्रभुता नांदावी यावर आम्ही भर दिल्याचं या निवदेनात म्हटलं आहे.
अफगाणिस्तानच्या स्थितीवरही मोदींनी जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, त्यांची सुरक्षा निश्चित व्हावी आणि चांगलं सरकार यावं यासाठी पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशात दहशतवाद निर्माण करण्यासाठी वापर केला जाऊ नये, यावरही चर्चा झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार वाढवण्यावर भर दिला. फ्री ट्रेड अॅग्रीमेंटच्या विषयावर दोन्ही देशाच्या टीम काम करत आहेत. त्यात चांगली प्रगती होत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आम्ही एफटीएच्या समारोपाच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडीवरही आम्ही चर्चा केली आहे, असं मोदींनी सांगितलं.
#WATCH I’ve the Indian jab (COVID19 vaccine) in my arm, and it did me good. Many thanks to India, says British PM Boris Johnson in Delhi pic.twitter.com/LiinvUCACB
— ANI (@ANI) April 22, 2022
संबंधित बातम्या: