नवी दिल्ली : सोमालिया जवळ हायजॅक झालेल्या बोटीबद्दल मोठी अपडेट आहे. जहाजावरील भारतीय क्रू च्या सुरक्षेसाठी नौदलाचे स्पेशल मरीन कमांडोज पोहोचले आहेत. गुरुवारी संध्याकाळी ‘एमवी लीला नॉरफॉक’ जहाजाच अपहरण झाल्याच माहिती मिळाली. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झालेल्या जहाजावर लायबेरियाचा झेंडा आहे. सर्वप्रथम UKMTO वेबसाइटवरुन जहाज अपहरणाबद्दल अलर्ट मिळाला. 5 ते 6 अपहरणकर्ते जहाजात चढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय नौदलाने झटपट पावल उचलली. कारण ‘एमव्ही लिला नॉरफोल्क‘ च्या क्रू मध्ये 15 भारतीय आहेत. नौदलाने तात्काळ एक टेहळणी विमान आणि INS चेन्नई ही युद्धनौका सोमालियच्या दिशेने रवाना केली. अपहरण झालेल्या जहाजावर भारताचे स्पेशल मरीन कमांडोज दाखल झाले आहेत. INS चेन्नई आणि नौदलाच विमान अपहरण झालेल्या जहाजाच्या मागावरच आहे. नेवीचे मार्कोस कमांडोज ऑपरेशन्ससाठी सज्ज आहेत.
नौदलाच एक हेलिकॉप्टरही या मिशनमध्ये आहे. समुद्री चाच्यांना जहाज सोडण्यासाठी इशारा देण्यात आला आहे. जहाजावरील भारतीय क्रू सदस्य सुरक्षित आहेत. मार्कोस कुठल्याही क्षणी या समुद्रा चाच्यांवर कारवाई करु शकतात. मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल ट्रेन कमांडोज आहेत. त्यांना अशा मिशनसाठीच ट्रेन केलं जातं. कुठल्याही गटाने अजूनपर्यंत या अपहरणाची जबाबदारी घेतलेली नाही. भारतीय क्रू मेंबर स्ट्राँगरुममधून जहाज ऑपरेट करत आहेत, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली.
#INSChennai diverted from #AntiPiracy patrol intercepted MV Lila Norfolk at 1515h on #05Jan 2024.
MV was kept under continuous surveillance using MPA, Predator MQ9B & integral helos.#IndianNavy MARCOs present onboard the Mission Deployed warship boarded MV & commenced… https://t.co/gotHLCZL5e— SpokespersonNavy (@indiannavy) January 5, 2024
ताज्या घटनेमुळे हा धोका अधोरेखित
परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या भागातील विविध यंत्रणांबरोबर समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं भारतीय नौदलाकडून सांगण्यात आलं होतं. समुद्री चाचांकडून या भागात अपहरणाच्या घटना घडत असताना. ताज्या घटनेमुळे हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.