अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारतीय नाही, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

| Updated on: Jan 21, 2024 | 1:45 PM

Indian plane crashed in Afghanistan | मॉस्कोला जाणारे एका विमानचा अपघात झाला आहे. अफगाणिस्तानमार्गे रशियाला जाणारे हे विमान कोसळले आहे. शनिवारी रात्रीपासून रडारवरुन हे विमान गायब झाले होते. सुरुवातीला हे विमान भारताचे असल्याची माहिती आली होती. परंतु हे विमान भारताचे नाही.

अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारतीय नाही, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
plane
Follow us on

नवी दिल्ली, दि.21 जानेवारी 2024 | मॉस्कोला जाणारे एक विमान रविवारी अफगाणिस्तानमध्ये कोसळले. हे विमान अफगाणिस्तानमार्गे रशियाला जात होता. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा अपघात झाला. हे विमान काल रात्री रडारवरून गायब झाले होते. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते कोसळले. विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीला हे विमान भारताचे असल्याची माहिती आली होती. परंतु हे विमान भारताचे नाही. भारताचे कोणतेही विमान अफगाणिस्थानच्या दिशेने गेले नाही, असा खुलासा नागरी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयकडून करण्यात आला आहे.

मोराक्कोचे होते विमान

अफगाणिस्तानमधील पर्वतारांगेत हा अपघात झाला. कुरण-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यात हे विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे. या विमानात किती प्रवाशी होते? त्यापैकी किती सुरक्षित आहेत किंवा किती ठार झाले आहेत याची माहिती अद्याप कळू शकलेले नाही. याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. हे विमान उत्तर आफ्रिकेतील मोरोक्क्याचे होते. या विमानात भारतीय प्रवाशी होते का? याची माहिती घेतली जात आहे.

हे सुद्धा वाचा

मार्ग भरकटले अन् झाला अपघात

मोराक्कोचे हे विमान होते. कोसळलेले विमान हे लहान एअरक्रॉप्ट होते. चार्टर पद्धतीचे असलेले हे विमान कोसळली.  अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी हे विमान भारताचे असल्याचे म्हटले होते. परंतु अर्ध्या तासांत हे भारताचे विमान नसल्याचे स्पष्ट झाले. या अपघाताची चौकशी केली जात आहे. मास्कोकडे जाणारे हे विमान मार्गात भरकटले होते.