India-maldives row | भारतासोबतचा वाद मालदीवला चांगलाच महाग पडला आहे. मालदीवच कंबरड मोडलं आहे. मालदीव पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. भारतीय पर्यटकांची संख्या घटल्याने मालदीवला चांगलाच फटका बसला आहे. या सगळ्या वादाचा मालदीवच्या पर्यटन उद्योगावर परिणाम झालाय. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने आकडे जारी केले आहेत. भारतासोबतच्या राजनैतिक वादामुळे मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 33 टक्क्याने घटली आहे. मार्च 2023 आणि मार्च 2024 मध्ये मालदीवला गेलेल्या पर्यटकांच्या आकड्यांच्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झालीय.
मागच्यावर्षी मार्च महिन्यात मालदीवला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये भारत दुसऱ्या स्थानी होता. पण आता भारत सहाव्या स्थानावर आहे. या वर्षी मार्च महिन्यात जवळपास 27 हजार पर्यटक मालदीवला गेले. मीडिया रिपोर्टनुसार, मार्च 2024 मध्ये 27,224 पर्यटक मालदीवला गेले. हेच मार्च 2023 मध्ये मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 41 हजारपेक्षा जास्त होती. म्हणजेच यंदाच्या वर्षी भारतीय पर्यटकांची संख्या 33 टक्क्याने घटली आहे.
किती हजार चिनी मालदीवला गेले?
अलीकडे लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हेच मालदीवच्या पर्यटक संख्येमध्ये घट होण्यामागच कारण आहे. मालदीवला जाणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी मार्च महिन्यात जवळपास 54 हजार चिनी नागरिकांनी मालदीवला भेट दिलीय.
मालदीवने भारतासोबत कुठल्या कराराच नूतनीकरण नाही केलं?
हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी भारतासोबतच्या कराराच नूतनीकरण न करण्याचा निर्णय मालदीवने घेतला आहे. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू भारतविरोधी असून त्यांचा चीनकडे कल जास्त आहे. मोफत सैन्य मदत मिळवण्यासाठी मालदीवने चीनसोबत एका संरक्षण करार केला आहे. मागच्यावर्षी मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती झाले, त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडत गेले. भारताने आपलं सर्व सैन्य माघारी बोलवून घ्याव, ही त्यांची प्रमुख मागणी होती. हिंद महासागर क्षेत्रात रणनितीक दृष्टीने मालदीव भारतासाठी महत्त्वाचा देश आहे.