गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील कॅनडाच्या आरोपांवर भारताची कारवाई, उच्चायुक्तांना बोलावले

| Updated on: Nov 02, 2024 | 7:08 PM

कॅनडा सरकार सध्या भारताच्या विरोधात जाऊन काम करत आहे. कॅनडातील एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी कॅनडा सरकारकडून या सर्व गोष्टी होत आहे. त्यांचा आरोप हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. कॅनडाने आता गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने भारताने कडक कारवाई केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील कॅनडाच्या आरोपांवर भारताची कारवाई, उच्चायुक्तांना बोलावले
Follow us on

भारताने गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल कॅनडाच्या मंत्र्यांची केलेल्या वक्तव्यावर जोरदार उत्तर दिले आहे. कॅनडाच्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे बेताल आणि निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे. याबाबत भारताने तीव्र निषेधही नोंदवलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले असून भारताच्या बाजूने निषेध नोंदवण्यात आला आहे. बेजबाबदार कृत्यांमुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील असे ही ते म्हणाले. भारताची बदनामी करण्यासाठी आणि इतर देशांवर प्रभाव टाकण्यासाठी कॅनडा जाणूनबुजून बिनबुडाचे आरोप करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, कॅनडाचे अधिकारी जाणूनबुजून भारताविरुद्ध निराधार गोष्टी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये पसरवत आहेत. ज्यामुळे भारताच्या प्रतिमेला डाग लागेल. यावरून असे दिसून येते की, कॅनडा सरकारच्या राजकीय अजेंड्यावर भारत काय विचार करत आहे ते योग्य आहे. अशा बेजबाबदार गोष्टींमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव वॉशिंग्टन पोस्टला लीक केल्याचे सांगितले. यानंतर एकच गोंधळ उडाला. कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या मोहिमेमागे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

कॅनडाने केलेल्या या आरोपांवर गदारोळ झाला. भारताने याला निरर्थक आणि निराधार म्हटले आहे. भारताच्या गृहमंत्र्यांवर कॅनडाचे आरोप चिंताजनक असल्याचे अमेरिकेने बुधवारी म्हटले आहे. या प्रकरणी कॅनडाच्या सरकारशी सल्लामसलत सुरू ठेवणार असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

कॅनडाच्या संसदेत दिवाळी साजरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही या संदर्भात काही अहवाल पाहिले आहेत. हे दुर्दैवी आहे की कॅनडातील सध्याचे वातावरण असहिष्णुता आणि अतिरेकीपणाच्या उच्च पातळीवर पोहोचले आहे. कॅनडाच्या सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची संख्या कमी केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की आम्ही कॅनडामध्ये काम करणाऱ्या आमच्या लोकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे.