आता विमानातही वायफाय, बिनधास्त वापरा इंटरनेट; सरकारचे नवे आदेश काय?

| Updated on: Nov 05, 2024 | 4:03 PM

भारत सरकारने विमानात इंटरनेट सुविधा वापरण्याबाबत नवीन नियम जाहीर केले आहेत. ३००० मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवासी वायफाय वापरू शकतील, पण टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान वायफाय बंद राहील. कॅप्टनच्या देखरेखीखाली आणि स्थिर वेगावरच वायफाय वापरण्याची परवानगी आहे. हे नियम स्थानिक मोबाईल नेटवर्कच्या हस्तक्षेपा टाळण्यासाठी आहेत.

आता विमानातही वायफाय, बिनधास्त वापरा इंटरनेट; सरकारचे नवे आदेश काय?
flight
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने विमानात इंटरनेट सुविधा वापरण्याबाबत काही नवीन नियम लागू केले आहे. केंद्र सरकारने विमान प्रवाशांसाठी इंटरनेट सुविधा वापरण्याबाबत एक निर्देश जारी केलाय. सरकारने सांगितले आहे की विमान उड्डाणाच्या वेळी प्रवासी वायफाय वापरून इंटरनेट सुविधा तीन हजार मीटर उंचीवर पोहोचल्यावर वापरू शकतात.केंद्र सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की प्रवासी फक्त 3000 मीटर उंचीवर गेल्यावरती इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू शकतात केंद्र सरकारने त्यांच्या अधिसूचनात नवीन नियमांमध्ये या सूचना दिल्या आहे.

केंद्र सरकारचे नवीन नियम

केंद्र सरकारच्या या नवीन अधिसूचित नियमांना उडान आणि समुद्र संपर्क असे म्हटले जाणारे. या आदेशातील उपनियम एक मध्ये म्हटले आहे की भारतीय उड्डाणक्षेत्रामध्ये उंचीवर असून देखील विमानात वायफाय वापरून इंटरनेट सेवा वापरूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करण्याची परवानगी असेल.

सरकारने यामुळे घेतला हा निर्णय

स्थानिक मोबाईल नेटवर्कचा हस्तक्षेप टाळण्यासाठी सरकारकडून हा निर्देश जारी करण्यात आला आहे. या आधी सरकारने 2020 मध्ये भारतातून जाणाऱ्या विमानांना मोफत वायफाय वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर विमान प्रवासा दरम्यान असलेले निर्बंध देखील काढण्यात आले होते. उड्डाण मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे प्रवासी विमानात वायफाय वापरू शकतात. मात्र ह्या साठी दोन अटी ठेवण्यात आल्या आहे. . पहिली अट आहे कि वायफाय चालू आणि बंद करण्याचा अधिकार कॅप्टनला असेल आणि दुसरी अट अशी कि विमानाचा वेग स्थिर असल्यावरच वायफाय सुरु केले जाईल. तसेच टेक ऑफ आणि लँडिंग वेळी वायफाय बंद राहील.

का आणला हा नियम?

केंद्र सरकारने उड्डाण आणि सागरी संपर्क नियम 2018च्या अंतर्गत हे आदेश दिले आहेत. विमान 3000 मीटर उंचावर गेल्यानंतर वायफाय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी फक्त भारतीय हवाई क्षेत्रापर्यंतच सीमित आहे. स्थानिक मोबाईल नेटवर्कच्या सोबतच्या हस्तक्षेपापासून दूर राहण्यासाठी केंद्र सरकारने हा नियम आणला आहे.

ऑगस्ट 2024च्या डेटानुसार, एव्हिएशन सेक्टरमध्ये 62.4 टक्क्यांची भागिदारी असणारी इंडिगो ही देशातील सर्वात मोठी एअरलाइन आहे. एअर इंडिया दुसऱ्या, विस्तारा तिसऱ्या तर एआयएक्स कनेक्ट चौथ्या स्थानी आहे.