नवी दिल्ली, दि.15 जानेवारी 2024 | कधी कधी मोठ्या व्यक्तींनी केलेली एखादी चूक लाभदायक ठरत असते. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भारतीय हवाईदलात निवड झाली नव्हती. यामुळे देशाला मिशाईल मॅन आणि राष्ट्रपती मिळाला. आता विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी एक चूक केली. ही एक चूक देशासाठी फायदेशीर ठरली. अजीम प्रेमजी यांनी केलेल्या या चुकीमुळे देशाला उद्योगपती नारायण मूर्ती मिळाले आणि इन्फोसिस कंपनी उभी राहिली. विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी एका मुलाखतीत आपल्या चुकीची माहिती दिली.
इन्फोसिसचे संस्थापक अजिम प्रेमजी यांनी विप्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांची निवड अजिम प्रेमजी यांनी केली नाही. आपली ही सर्वात मोठी चूक होती, असे त्यांनी सांगितले. आपली ती चूक झाली नसती तर आपणास स्पर्धेक म्हणून इन्फोसिस उभी राहिली नसती. आज इन्फोसिसचे मार्केट कॅपिटल 6.65 लाख कोटी तर विप्रोचे मार्केट कॅपिटल 2.43 लाख कोटी रुपये आहे.
नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये सहा मित्रांसोबत कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले आहे. त्यानंतर इन्फोसिस कंपनीची निर्मिती झाली. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस शून्यातून सुरु केली तर प्रेमजी यांना विप्रो कंपनी वंशपरंपरेने मिळाली. त्यांनी वनस्पती तेलाच्या या कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बदलले.
विप्रो आणि इन्फोसिसचे मुख्यालय बेंगळुरुमध्येच आहे. विप्रो कंपनीची स्थापना अजीम प्रेमजी यांचे वडील एमएच हाशम प्रेमजी यांनी 1945 मध्ये केली. तर इन्फोसिसचा जन्म 1981 मध्ये झाला. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश, एनएस राघवन आणि अशोक अरोडा यांनी मिळून केली. नारायण मूर्ती यांनी आपल्या कंपनीत परिवारातील एकाही सदस्याला घेतले नाही. यामुळे त्यांची पत्नी सुधा मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती कंपनी ज्वाईन करु शकले नाही.