महापरिनिर्वाण दिनादिवशीच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अपमान, नेमका विषय काय…

| Updated on: Dec 06, 2022 | 11:27 PM

निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना अटक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच संविधानाची पायमल्ली करण्यात आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

महापरिनिर्वाण दिनादिवशीच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अपमान, नेमका विषय काय...
Follow us on

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असतानाच आज कर्नाटकाने महाराष्ट्रातील दोन मंत्री बेळगावमध्ये जाणार असल्याने जमावबंदीचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या बेळगावमधील मराठी भाषिकांवर आता कर्नाटक सरकारकडून संविधानिक पद्धतीने आवाज उठवणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर आता कर्नाटक सरकारची अरेरावी चालू आहे. सीमावाद चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातून मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज बेळगावला जाणार होते.

मात्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर संविधानिक मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आज बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.

त्यावेळी कर्नाटक सरकारने दडपशाही करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चाळीसहून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली.

बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक केल्यानंतर बेळगावसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक सरकारकडून ही मुस्कटदाबी असल्याची भावना आता सीमाभागातील मराठी भाषिकांकडून व्यक्त केली जात आहे.

निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना अटक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच संविधानाची पायमल्ली करण्यात आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

त्याबद्दल बेळगावमधील कंग्राळी खुर्द गावाने सूचना फलकावर महापरिनिर्वाण दिनादिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच अपमान केल्याचे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

बेळगावमध्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर या घटनेचा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्द यांच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो असा टोलाही त्यांनी कर्नाटक सरकारला लगावला आहे.