ISRO : जबरदस्त, इस्रोची कमाल, आता संकट येण्याआधीच कळणार

| Updated on: Aug 16, 2024 | 10:48 AM

ISRO : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आतापर्यंत भारतीयांना अभिमानाचे अनेक क्षण दिले आहेत. इस्रोने आता आणखी एक कारनामा केलाय. त्यामुळे नैसर्गिक संकट येण्याआधीच कळणार आहे. त्यामुळे जिवीतहानी, वित्तहानी टाळता येऊ शकते. मोठ्या प्रमाणात नुकसान कमी करता येऊ शकतं.

ISRO : जबरदस्त, इस्रोची कमाल, आता संकट येण्याआधीच कळणार
ISRO
Follow us on

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने कमाल केलीय. आजच्या तारखेची इतिहासात नोंद झाली आहे. अवकाश संशोधनात इस्रोने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आज 16 ऑगस्टला 9 वाजून 17 मिनिटांनी अवकाशात असं सॅटलाइट लॉन्च केलय, जे संकट येण्याआधी माहिती देईल. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन इस्रोने नवीन रॉकेट SSLV D3 मधून हा उपग्रह लॉन्च केला. EOS-08 मिशन अंतर्गत नवीन पृथ्वी निरीक्षण सॅटलाइट लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅटलाइट संकट येण्याआधी सावध करेल.

अर्थ ऑब्जरवेशन सॅटलाइट (EOS-08) असा उपग्रह आहे, जो पृथ्वीवर लक्ष ठेवेल. कुठलही संकट येण्याआधी इशारा देईल. त्यामुळे संकटाचा सामना करण थोडं सोप होईल. या सॅटलाइटच वजन जवळपास 175.5 किलोग्रॅम आहे. यात तीन पेलोड आहेत. इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (ईओआयआर), दूसरा ग्लोबल नेविगेशन सॅटेलाइट सिस्टम-रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (जीएनएसएस-आर) आणि तिसरा एसआयसी यूवी डोसिमीटर आहे.

या सॅटलाइटमुळे काय-काय शक्य होणार आहे?

इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ यश मिळवलं आहे. मागच्यावर्षी भारताची महत्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली. रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतर चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला. आता नैसर्गिक संकटांची आगाऊ माहिती देणारा उपग्रह लॉन्च करण्यात आला आहे. इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोडला मिड वे आयआर आणि लॉन्ग वेव आयआर बँड दिवसा-रात्री फोटो काढण्यासाठी डिजाइन केलं आहे. या सॅटलाइटला आग आणि ज्वालामुखीची माहिती देण्यासाठी तयार केलं आहे. महासागरात पृष्ठभागावरील हवा, पुराची माहिती देण्यासाठी रिमोट सेंसिंगची सुद्धा या उपग्रहात क्षमता आहे.