Chandrayaan-3 Update | आता तो आवाज पुन्हा ऐकू नाही येणार, चांद्रयान-3 ठरलं वलारमथी यांचं शेवटच मिशन

| Updated on: Sep 04, 2023 | 9:31 AM

Chandrayaan-3 Update | सर्व देश इस्रोच्या यशाच सेलिब्रेशन करतोय. या दरम्यान एक दु:खद बातमी आहे. इस्रोच्या एका महिला वैज्ञानिकाच निधन झालं. चांद्रयान-3 हे त्याच शेवटच मिशन ठरलं. महत्त्वाच म्हणजे प्रत्येक मिशनमध्ये या वैज्ञानिकांनी एक वेगळी ओळख होती.

Chandrayaan-3 Update | आता तो आवाज पुन्हा ऐकू नाही येणार, चांद्रयान-3 ठरलं वलारमथी यांचं शेवटच मिशन
Chandrayaan 3 Mission Isro scientist death
Follow us on

चेन्नई : भारतात सध्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या प्रत्येक यशाच सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचवेळी इस्रोमधून एक दु:खद बातमी आलीय. भारताच्या वैज्ञानिक वलारमथी यांचं कार्डिएक अरेस्टने निधन झालं. इस्रोच्या जितक्या पण मोहीमा झाल्या, त्यात काऊंटडाऊनच्या दरम्यान जो आवाज ऐकू यायचा, तो वलारमथी यांचा होता. पण आता हा आवाज पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. चांद्रयान-3 हे वैज्ञानिक वलारमथी यांचं शेवटत मिशन ठरलं. 14 जुलैला श्रीहरिकोटा येथून मिशन चांद्रयान-3 ची सुरुवात झाली होती. त्यावेळी ISRO च्या कक्षात जो आवाज ऐकू यायचा, तो वलारमथी यांचा होता. त्या तामिळनाडूच्या अलियायुर येथे रहायच्या. वलारमथी यांनी शनिवारी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. इस्रोचे माजी डायरेक्टर पी.वी. वेंकटकृष्णन यांनी टि्वट करुन वलारमथी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं.

श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या पुढच्या मिशन्समध्ये आता काऊंटडाऊन दरम्यान वलारमथी मॅडमचा आवाज ऐकू येणार नाही. चांद्रयान-3 मिशन त्यांची फायनल असायनमेंट होती. हा खूप दु:खद क्षण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली. इस्रोमधील त्यांच्या योगदानासाठी सलाम केला. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाच कौतुक करायचा. प्रत्येकासोबत त्यांचं एक कनेक्शन बनलं होतं. मागच्या काही दिवसांपासून इस्रोची देशभरात चर्चा आहे. चांद्रयान-3 मिशनमुळे आज प्रत्येकाला इस्रोचा अभिमान वाटतोय. चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करुन नवीन इतिहास रचला.



मिशनमधील सर्व उद्दिष्टय पूर्ण

आता आदित्य एल-1 मिशन सुरु झालय. सूर्याचा अभ्यास करण हा या मिशनमागे उद्देश आहे. इस्रोची चांद्रयान-3 मिशनमधील सर्व उद्दिष्टय पूर्ण झाली आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला आता स्लीप मोडमध्ये पाठवण्यात आलय. आता सगळ्यांना 22 सप्टेंबरची प्रतिक्षा आहे. या दिवशी चंद्रावर पुन्हा सर्योदय होईल. विक्रम आणि प्रज्ञान चंद्रावर पुन्हा काम सुरु करतील, अशी अपेक्षा आहे.