भारताने अवकाशात नवीन किर्तीमान स्थापित केलाय. इस्रोला स्पेडेक्स मिशनच्या डॉकिंगमध्ये ऐतिहासिक यश मिळालय. इस्रोने पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले आहेत. भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला आहे. खरच भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पीएम मोदी यांनी या यशासाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदी यांनी उपग्रहांच्या अवकाशातील डॉकिंगच्या यशासाठी इस्रोचे वैज्ञानिक आणि सगळ्या अंतरिक्ष समुदायाला शुभेच्छा दिल्या. भविष्यातील भारताच्या महत्वकांक्षी अवकाश मोहिमांसाठी हे एक महत्त्वाच पाऊल आहे. 12 जानेवारीला या मिशनची ट्रायल चाचणी पूर्ण झाली होती.
इस्रोने या ऐतिहासिक यशसासाठी सगळ्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. स्पेडेक्स मिशनची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच इस्रोकडून सांगण्यात आलं. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 15 मीटर ते 3 मीटर होल्ड पॉइंट पर्यंत आणण्याची प्रोसेस पूर्ण झाली. स्पेसक्राफ्टला यशस्वीरित्या कॅप्चर करण्यात आलं. अवकाशात यशस्वी डॉकिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. डॉकिंग म्हणजे अवकाशात कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांच्या जवळ आणणं, त्यांना जोडणं.
आधी दोन उपग्रहांमधील अंतर किती होतं?
रविवारी 12 जानेवारीला स्पेडेक्स मिशनमधील दोन उपग्रह चेसर आणि टार्गेट परस्परांच्या खूप जवळ आले होते. दोन्ही सॅटलाइटना आधी 15 मीटर आणि नंतर 3 मीटरपर्यंत जवळ आणण्यात आलं होतं. याच्या एकदिवस आधी शनिवारी स्पेस डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पेडेक्स) मिशनमधील दोन उपग्रहांमधील अंतर 230 मीटर होतं. या आधी दोन ते तीनवेळा हा प्रयोग स्थगित करण्यात आला होता.
SpaDeX Docking Update:
🌟Docking Success
Spacecraft docking successfully completed! A historic moment.
Let’s walk through the SpaDeX docking process:
Manoeuvre from 15m to 3m hold point completed. Docking initiated with precision, leading to successful spacecraft capture.…
— ISRO (@isro) January 16, 2025
मिशन कधी लॉन्च झालेलं?
स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशनचा उद्देश अवकाशात डॉकिंग टेक्नोलॉजीच प्रदर्शन करणं होतं. भविष्यातील भारताच्या अवकाश मोहिमांसाठी ही टेक्नोलॉजी खूप महत्त्वाची आहे. आता हे मिशन अवकाश स्टेशन आणि चांद्रयान-4 च यश निश्चित करेल. इस्रोने या मिशनसाठी 30 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन PSLV-C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रह लॉन्च केले होते.
Congratulations to our scientists at @isro and the entire space fraternity for the successful demonstration of space docking of satellites. It is a significant stepping stone for India’s ambitious space missions in the years to come.
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2025
या टेक्नोलॉजीचा भविष्यात कुठल्या मिशनमध्ये फायदा?
या उपग्रहांच वजन 220 किलो होतं. चंद्रयान-4 मिशनमध्ये याच डॉकिंग-अनडॉकिंग टेक्नोलॉजीचा वापर होणार आहे. नासाप्रमाणे स्वत:च स्पेस स्टेशन बनवण्यात या मिशनमधील टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे. माणसाला चंद्रावर पाठवण्यासाठी सुद्धा या टेक्नोलॉजीची गरज भासणार आहे.