ISRO : इस्त्रोकडून वर्षातील पहिली मोहीम फत्ते, PSLV-C52 चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा Video

| Updated on: Feb 14, 2022 | 7:35 AM

भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना (ISRO) म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिली मोहीम यशस्वीपणे फत्ते केली आहे. आज पहाटे 5.59 वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (PSLV-C52) येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं.

ISRO : इस्त्रोकडून वर्षातील पहिली मोहीम फत्ते, PSLV-C52 चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा Video
ISRO
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना (ISRO) म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिली मोहीम यशस्वीपणे फत्ते केली आहे. आज पहाटे 5.59 वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (PSLV-C52) येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं. इस्त्रोनं आज सकाळी PSLV-C52 मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले आहेत. यामध्ये EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत. इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. 2022 चं पहिलं मिशन यशस्वी फत्ते झाल्यानं इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.

आगामी काळात चंद्रयान मोहीम

मिळालेल्या माहितीनुसार PSLV-C52 च्या अनुसार पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवण्यात आलं. इस्त्रोनं याची माहिती यापूर्वी दिली होती. या मोहिमेच प्रक्षेपण इस्त्रोच्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या माहितीनुसार या यशस्वी मोहिमेमुळं इतर योजनांना फायदा होईल याशिवाय येत्या काळात चंद्रयान 3 आणि गगनयान यासह 19 सॅटेलाईट आगामी काळात लाँच करण्यात येणार आहेत.

इस्त्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारताकडून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणाद्वारे (EOS-504) आणि इतर दोन छोटे सॅटेलाईट यशस्वी पणे प्रक्षेपित करण्यात आले असून ते अंतराळात अंदाजित ठिकाणी स्थापित झाले आहेत. PSLV-C52 चे अंतराळात यशस्वी उड्डाण श्रीहरीकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या करण्यात आलं.श्रीहरिकोटा मधून आज सकाळी 529 किमी उंचीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रहाचे उड्डाण झालं.

पाहा व्हिडीओ

इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. EOS-504, यानंतर PSLV-C53,OCEANSAT-3, INS2B या उपग्रहांचं मार्चमध्ये प्रक्षेपण केलं जाईल. तर, एप्रिलमध्ये SSLV-D1 मायक्रोसॅट लाँचिंग केलं जाईल, अशी माहिती आहे.

इतर बातम्या:

UP Goa Uttarakhand Election 2022 Voting LIVE updates : गोवा उत्तराखंडमध्ये सर्व जागांसाठी, उत्तर प्रदेशमध्ये 55 जागांसाठी मतदान

Maharashtra News Live Update : काँग्रेस आणि भाजप आज पुन्हा आमने सामने, देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

ISRO successfully launches 2022 first mission PSLV C52 satellite EOS 04 into space check details here