नवी दिल्ली : जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच आशास्थान आहेत. बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक अपील केलय. कारण जगातील बहुतांश देश या समस्येवर उत्तर शोधू शकलेले नाहीत. शाही इमामांना आता फक्त मोदींच्या रुपानेच अंतिम तोडगा दिसतोय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेप करण्यासाठी अपील केलय. इस्रायल आणि हमासमध्ये गाजा पट्टीत युद्ध सुरु आहे. या युद्ध समाप्तीसाठी आणि संघर्षावर स्थायी तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा करावी सैयद अहमद बुखारी यांनी भावनिक अपील केलय. मुस्लिम जग इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष प्रभावी पद्धतीने समाप्त करण्यासाठी, आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी सक्षम नाहीय असं बुखारी यांनी म्हटलय.
सैयद अहमद बुखारी यांनी संयुक्त राष्ट्र, अरब लीग आणि खाड़ी सहयोग परिषदेच्या प्रस्तावाच्या आधारावर पॅलेस्टाइन मुद्दा तात्काळ सोडवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. शाही इमामांनी इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्दावर टू-स्टेट फॉर्म्युल्याच समर्थन केलं. शाही इमामांनी युद्धामधील जखमींची संख्या आणि मानवीय संकटावर चिंता व्यक्त केली. या युद्धात आतापर्यंत 21,300 पेक्षा जास्त पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
भारताची भूमिका काय आहे?
भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत एका मसुदा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं. इस्रायल-हमास संघर्षात तात्काळ मानवी युद्धविरामासह सर्व बंधकांची विनाअट सुटका करण्याची मागणी केली होती. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात शांतता आणि स्थिरतेच समर्थन करण्यासाठी भारताची कटिबद्धता दिसून येते. भारताने पॅलेस्टाइनला कोट्यवधी रुपयांची मदत पाठवली आहे. त्याशिवाय गाजाच्या लोकांसाठी अन्न-पाणी आणि अन्य आवश्यक सामान पाठवलय. भारत इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात टू-स्टेट फॉर्म्युल्याच समर्थन केलय.