जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 90 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फ्रेंस आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला शंकराचार्य पर्वताच्या मुद्यावरुन घेरलं आहे. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसला शंकराचार्य पर्वताच नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करायच आहे का? असा प्रश्न विचारला. शंकराचार्य पर्वताच नाव कसं पडलं? त्या बद्दल जाणून घेऊया. रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कॉन्फ्रेंसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शंकराचार्य पर्वताच नाव बदलून तख्त ए सुलेमान करणार असल्याच म्हटलं आहे. श्रीनगरमध्ये हा पर्वत आहे. या टेकडीवर शंकराचार्य मंदिर आहे. शंकराचार्य मंदिर भगवान शिव शंकरांना समर्पित आहे. काश्मीर खोऱ्यातील हे सर्वात जुनं मंदिर आहे.
शंकराचार्य पर्वताबद्दल एक प्राचीन इतिहासकाराने सांगितलं की, या पर्वताला आधी जीतलार्क किंवा जेठा लारक म्हटलं जायचं. त्यानंतर या पर्वताच नाव बदलून गोपादारी पर्वत झालं. ‘राजतरंगिणी’ नावाच्या संस्कृत ग्रंथात कल्हण यांनी लिहिलय की, राजा गोपादित्यने आर्यदेशातून (आर्य भूमी) आलेल्या ब्राह्मणांना पर्वताच्या खाली जमीन दिली. राजा गोपादित्यनी 371 ईसा पूर्वच्या आसपास ज्येष्ठेश्वर मंदिराच्या रूपात पर्वतावर मंदिर बनवलं होतं. त्यामुळेच या पर्वताला आधी जेठा लारक म्हटलं जायचं.
इतिहास काय सांगतो?
जम्मू कश्मीर टूरिज्म डेवलपमेंट कार्पोरेशन (jktdc) नुसार, शंकराचार्य पर्वतावर बनवलेल हे मंदिर मौर्य राजवंशचे सम्राट अशोक यांच्या मुलाने बनवलं होतं. राजतरंगीनी ग्रंथानुसार, गोनंदिया राजवंशचे राजा अशोकचा पुत्र जलोकाने हे मंदिर बनवलं होतं.
शंकराचार्य या मंदिरात थांबले होते
असं म्हणतात की, 8व्या शताब्दीच्या ईस्वीमध्ये भारतीय वैदिक विद्वान आणि उपदेशक आदि शंकराचार्य यांनी या भागाचा दौरा केला होता. jktdc च्या रिपोर्टनुसार, महान दार्शनिक शंकराचार्य जेव्हा सनातन धर्म पुनर्जीवित करण्यासाठी काश्मीरला गेलेले. त्यावेळी डोंगरावर बांधलेल्या या मंदिरात थांबले होते. हे, तेच स्थान आहे, जिथे आदी शंकराचार्यांनी ज्ञान प्राप्त केलं होतं. एका आंकड्यानुसार हे मंदिर श्रीनगर शहरापासून 1100 फुट उंचीवर आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळपास 240 शिड्या चढाव्या लागतात.
तख्त ए सुलेमान नाव कुठून आलं?
सुलेमानच्या नावाबद्दल लोकांची अशी मान्यता आहे की, इस्लामच्या आगमनाआधी या पर्वतावर सुलेमान (ज्या सोलोमन आणि सँडीमॅनही म्हटलं जातं) नावाच्या व्यक्तीने विजय मिळवला होता. सुलेमान आपले अनुयायांसोबत तिथे आला होता. तेव्हापासून या जागेच नाव तख्त-ए-सुलेमान, पर्वताला कोह-ए सुलेमान आणि काश्मीरच नाव बाग ए सुलेमान पडलं.
Upon reaching Srinagar a short while ago, had the opportunity to see the majestic Shankaracharya Hill from a distance. pic.twitter.com/9kEdq5OgjX
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
मुगलांशी काय संबंध?
शंकराचार्य मंदिर पुरातत्व स्मारक, स्थळ आणि अवशेष अधिनियम, 1958 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील संरक्षित स्मारक है. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे (ASI) देखभालीची जबाबदारी आहे. 2013 मध्ये श्रीनगरमध्ये एक मोठ विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी आरोप झालेला की, ASI ने शंकराचार्य हिलच नाव बदलून ‘तख्त-ए-सुलेमान’ केलं. मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराच्या नव्या पट्टिकेवर लिहिलेलं की, मुगल बागशाह शाहजहांने 1644 ई. मध्ये शंकराचार्य मंदिरच छप्पर बनवलं.
मंदिराच्या निर्माणापासून आतापर्यंत अनेकवेळा दुरुस्ती झाली आहे. ललितादित्यच्या शासनकाळात आणि नंतर भूकंपात मंदिर क्षतिग्रस्त झाल्यानंतर जैन-उल-आबिदीन यांनी दुरुस्ती केली.