जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील हैदरपोरा येथे झालेल्या चकमकीत ज्या सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला त्याची चौकशी झालीच पाहिजे. गुलाम नबी आझाद म्हणाले की, त्यांच्या काळातही काही निष्पाप लोक मारले गेले ज्यांना दहशतवादी म्हटले गेले होते, मात्र ते तपासात निर्दोष आढळले आणि आज दोषी तुरुंगात आहेत. सुरक्षा दल चांगले काम करत आहे, मात्र सुरक्षा दलांनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असेही ते म्हणाले.
याशिवाय त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असून आम्ही जम्मू-काश्मीरला राज्य बनवू, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गुरूवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी हैदरपोरा चकमकीत ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह परत मिळावेत या मागणीसाठी आंदोलन केले. याशिवाय, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना बुधवारपासून नजरकैदत ठेवले गेले आहे. चकमकीत निरपराधांना ठार केल्याच्या आरोपांनंतर, मृतांच्या नातेवाईकांनी आयोजित केलेल्या आंदोलनात उपस्थित राहण्यासाठी त्या जात होत्या.
This is the naya Kashmir of 2021. This is how the J&K police fulfils @PMOIndia promise to remove “dil ki doori & Dilli se doori. It’s outrageous that the J&K administration did not allow the families to conduct a peaceful sit in protest. https://t.co/e5zss2R0cI
— Omar Abdullah (@OmarAbdullah) November 18, 2021
श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीवरून वाद निर्माण झाला आहे. ठार झालेले दोन नागरिक हे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर मृतांच्या नातेवाईकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात नागरिक ठार झाल्याचे पोलिसांनी मान्य केले, तरीही त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्याऐवजी हंदवाडा येथे पुरण्यात आले, असा आरोप अब्दुल्ला यांनी केला.
गुरुवारी, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हैदरपोरा चकमकीच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयाने ट्विट केले आणि लिहिले की हैदरपोरा चकमकीच्या एडीएम दर्जाच्या अधिकाऱ्याने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल समोर येताच सरकार योग्य ती कारवाई करेल. केंद्रशासित प्रदेशातील लोकांना आश्वासन देताना उपराज्यपाल म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर प्रशासन निष्पाप नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि याची काळजी घेतली जाईल. कोणाकडून कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, सिन्हा म्हणाले.
A magisterial inquiry by officer of ADM rank has been ordered in Hyderpora encounter.Govt will take suitable action as soon as report is submitted in a time-bound manner.JK admin reiterates commitment of protecting lives of innocent civilians&it will ensure there is no injustice.
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) November 18, 2021
15 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील हैदरपोरा भागात एका खाजगी इमारतीमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, त्यांची ओळख परदेशी पाकिस्तानी दहशतवादी हैदर आणि त्याचा सहकारी अमीर अहमद अशी आहे. तसेच इमारतीचे मालक अल्ताफ अहमद, भाडेकरू मुदासीर अहमद यांनाही शोध पथकासोबत बोलावण्यात आल्याचे सांगितले. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोघांनाही गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, पोलीस म्हणाले.
इतर बातम्या-