नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सातत्याने सुरु असलेल्या बर्फवृष्टीनंतर (Heavy Snowfall) हवामान खराब बनले आहे. त्यामुळे माता वैष्णो देवीची (Mata Vaishno Devi) यात्रा 6 जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती श्री माता वैष्णो देवी मंदिर संस्थानने दिली आहे. खराब हवामानंतर 6 जानेवारीच्या सकाळपर्यंत वैष्णो देवीची यात्र स्थगित करण्यात आली आहे. बुधवारी 18 हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची आणि पूजा केल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
तत्पूर्वी वैष्णोदेवी मंदिर संस्थानने भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक केलं आहे. वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रविवारी महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ऑफलाईन दर्शन पूर्णपणे बंद केलं आहे. तसंच यात्रेकरुंचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर करत आरएफआयडी ट्रॅकिंग सिस्टिमचा वापर करण्यासह गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Yatra slips for Mata Vaishno Devi temple to be issued only through Shrine Board’s website, mobile app
Read @ANI Story | https://t.co/Dfj6utUxKJ#Vaishnodevi pic.twitter.com/wqKgNDWDJC
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2022
1 जानेवारी रोजी ऐन नववर्षाचे तांबडे फुटल्यावर जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे माता वैष्णोदेवी यांच्या यात्रेवर बंदी होती. कोरोना निवळल्यानंतर यात्रा आयोजनाचे आदेश दिले. मात्र, इथेच घात झाला आणि नववर्षाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
जम्मूमधील कटरा येथील मंदिरात रात्री पावणेतीनच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. आपल्या नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने व्हावी, यासाठी संध्याकाळपासूनच येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. मात्र, सध्या कोरोनाचे निर्बंध लागू असताना इतके जण इथे कसे काय जमले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी त्यांच्यात आपापसात वाद झाले. त्याचे पर्यवसन धक्का-बुक्कीत झाले आणि पाहता-पाहता एकच गोंधळ उडाला. त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं.
इतर बातम्या :