संसदेवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरलेला अफजल गुरू यांचा भाऊ एजाज गुरू आहे. संसद हल्ल्यात दोषी ठरल्यानंतर 2013 मध्ये अफजल याला फाशी देण्यात आली होती. 58 वर्षीय एजाज गुरु हा नववी पास आहे. त्याने पशुसंवर्धन विभागातही काम केले आहे. नोकरीतून व्हीआरएस घेऊन ठेकेदारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या माहितीनुसार, एजाज गुरु याच्याकडे 50 लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच आठ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्याच्या नावावर सहा लाख रुपयांचे बँकेचे कर्ज आहे. त्याच्या पत्नीकडे तीन लाखांची संपत्ती आहे.
विधानसभा निवडणूक लढवणारे एजाज गुरू म्हणतो की, मी भावाच्या नावावर मते मागणार नाही. माझी विचारधारा माझ्या भावाच्या विचारसरणीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. माझा मुलगा शोएब इजाज गुरु याला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक केली. यामुळे आपण निवडणूक लढवत असल्याचे एजाजने सांगितले.
सोपोर विधानसभा मतदार संघ जमात-ए-इस्लामीचा बालेकिल्ला आहे. जमातच्या आवाहनावर सोपोर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवर एकेकाळी पूर्ण बहिष्कार टाकण्यात आला होता. गेल्या 50 वर्षांपासून सोपोरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत एजाज निवडणुकीत उतरला आहे. या ठिकाणी जुने वैभव परत मिळवून देण्याचे आश्वासन तो देत आहेत. विकास आणि एकात्मतेबद्दल तो बोलत आहेत.