श्रीनगर : भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून एक जॉइंट ऑपरेशन केलं. आतापर्यंतच्या कारवाई भारतीय सैन्याला मोठ यश मिळालय. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये हे ऑपरेशन सुरु आहे. भारताला घायाळ करण्यासाठी आलेल्या या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवलाय. भारतीय सैन्याच्या ऑपरेशनमध्ये लश्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु आहे. दहशतवाद्यांना पळण्याची संधी मिळू नये, म्हणून भारतीय सैन्याने परिसरात घेराबंदी सारखी पावल उचलली आहेत.
रात्रभर शांतता होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कुलगामच्या नेहामा समनो भागात गोळीबार सुरु झाला. या भागात दहशतवादी असल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरुवातीला कुलगामच्या नेहामा गावात घेराबंदी आणि शोध अभियान सुरु झालं. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु करताच परिस्थिती बिघडली. त्यानंतर ही शोधमोहिम चकमकीमध्ये बदलली.
कुठल्या संघटनेचे दहशतवादी ?
दहशतवादी जिथे अडकले आहेत, त्या भागाची सुरक्षा पथकांनी चहूबाजूंनी घेराबंदी केली आहे. ऑपरेशन रात्रीच्या वेळी थांबलं होतं. भारतीय सैन्याच्या बाजूला कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, घेराबंदी केलेल्या भागात लश्कर-ए-तैयबाचा तीन दहशतवादी अडकल्याची शक्यता होती. यात दोन स्थानिक दहशतवादी तर एक परदेशी होता. प्रत्यक्षात तीनच दहशतवादी होते की, त्यांची संख्या अजून जास्त आहे याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केलेली नाही.
#WATCH | J&K | Joint operation by security forces against terrorists continues for the second day at Samnoo area of Kulgam. Army’s 34 Rashtriya Riffles, 9 Para (elite special forces unit), Police and CRPF are carrying out the operation.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/2gymTKFMA2
— ANI (@ANI) November 17, 2023
ऑपरेशनमध्ये पॅरा स्पेशल फोर्सेस
रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी जवानांनी जंगलाच्या भागात शोध मोहिमेला अजून वेग दिलाय. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्यानंतर सर्च टीमने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी चहूबाजूंनी परिसराला घेराव घातला. जॉइंट ऑपरेशनमध्ये सैन्याच्या 34 राष्ट्रीय रायफल, 9 पॅरा स्पेशल फोर्सेस, पोलीस आणि सीआरपीएफची टीम सहभागी आहे.