जम्मू काश्मीर : जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir News) झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा (Terrorist) खात्मा करण्यात आला. सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये पुलवामात (Pulwama Encounter) चकमक झाली. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. तर अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके 47 रायफल्सचा समावेश असून एक पिस्तूल आणि मोठ्या संख्येनं दारुगोळ्याचाही समावेश आहे. चकमकीनंतर आता जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावं इरफान मलिक, फजिल नजीर भट्ट, जुनैद कादिर यांचा समावेश आहे. हे तिघेही लष्कर-ए-तोयबाशी आ अतिरेकी संघटनेचे सदस्य होते. पंधरा दिवसांच्या आत जम्मू काश्मिरात जवानांनी पुलवामात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
खात्मा करण्यात आलेल्या अतिरेकी इरफानचं वय 25 वर्ष होतं, तो पुलवामाच्या हरिपोरा इथला होता. तर फाजिल नजीर भट्टचं वय 21 वर्ष होता. फालिलही पुलवामाचाच होत. तर पुलवामाच्या गुदौरच्या जुनैद कादिरचं वय अवघं 19 वर्ष होतं. या तिघांची चकमकीत खात्मा करण्यात आलाय. जम्मू काश्मीर पोलिसांनी या बाबतची माहिती दिलीय. हे सर्व अतिरेकी स्थानिक होतो. त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते, असंही काश्मीर पोलिसांनी म्हटलंय.
#PulwamaEncounterUpdate: Other two killed #terrorists have been identified as Fazil Nazir Bhat & Irfan Ah Malik of #Pulwama district. #Incriminating materials, arms & ammunition including 02 AK 47 rifles and 01 pistol recovered: IGP Kashmir@JmuKmrPolice https://t.co/NxhjdtVRP2
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 12, 2022
पंधरा दिवसांपूर्वीच काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक झाली होती. यात लष्कर-ए-तोयबाच्या एका डिप्युटी कमांडरसह तिघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांना मारण्याआधीचा या अतिरेक्यांचा एक व्हिडीओही समोर आलेला होता. ड्रोनच्या मदतीने अतिरेकी कुठे लपून बसलेत, याची माहिती समोर आलेली. त्यानंतर जवानांनी अतिरेक्यांची पोझिशन आणि त्यांच्या असलेली हत्यारं यांची माहिती पोलिसांना मिळाली होती.
एका घराच्या मागे तीन अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती समोर आली होती. हे तिन्ही अतिरेकी अंधार होण्याच वाट पाहत होते. ड्रोनच्या मदतीमुळे या अतिरेक्यांची पोझिशन कळल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना घेरलं. चारही बाजूने नाकाबंदी केली. जवानांना यमसदनी धाडलं होतं. दरम्यान आता पंधरा दिवसांनंतर आणखी तिघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलाय.