पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून नितिश कुमार ‘आऊट’; ‘या’ तारखेनंतर नावावर होणार शिक्कामोर्तब

| Updated on: Jun 12, 2023 | 12:15 AM

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की 2024 च्या निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? यावर चर्चा ही केंद्रातून भाजपला हटवल्यानंतरच या विषयावर स्पष्टपणे सांगितले जाईल.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून नितिश कुमार आऊट; या तारखेनंतर नावावर होणार शिक्कामोर्तब
Follow us on

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी शड्डू ठोकला आहे. त्यावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र आता वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नितीश कुमार हे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील असं जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांनी रविवारी स्पष्ट केले. नितीश कुमार केवळ विरोधी पक्षांना जोडण्याचे काम करत असल्याचे लालन सिंह यांनी सांगितले. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नसणार आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.  कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालन सिंह यांनी म्हटले की, नितीशकुमार हे केवळ भाजपला केंद्रातून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे ते विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत त्यांचे सहकार्य घेत आहेत. त्यासोबतच 23 जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत अनेक पक्षांचे नेते सहभागी होत असल्याचेही लालन सिंह यांनी सांगितले.

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्लाही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की 2024 च्या निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? यावर चर्चा ही केंद्रातून भाजपला हटवल्यानंतरच या विषयावर स्पष्टपणे सांगितले जाईल. तसेच जेडीयूचे कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या बैठकीत नितेश कुमार यांच्या नावाच्या जोरदारपणे घोषणा देण्यात आल्या होत्या.

यावेळी कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या या घोषणांवर लालन सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अशा घोषणांमुळे विरोधकांकडून एकजूटीची जोरदार तयारी केली जाऊ शकते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे जेडीयू कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देऊ नयेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ते मैदानात उतरणार आहेत.

याबाबत आतापासून विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्र येत आहेत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.

त्यामुळेच विरोधी पक्षाकडून नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत असे मानले जात होते. मात्र, आता जेडीयू अध्यक्षांनी नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत या विषयावर त्यांनी पडदा टाकला आहे.