असा IAS ऑफिसर सर्वांना मिळो, कार्यालयातील शेवटच्या दिवशी जे केलं त्याला सलाम

| Updated on: Jul 29, 2023 | 8:37 AM

IAS Officer | 'संस्कारी बाबू', शिपायापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच जिंकलं. हा IAS अधिकारी मनाने किती मोठा आहे? ते दिसून आलं. अखेरच्या दिवशी हा अधिकारी शिपायाजवळ खूप मोठी गोष्ट बोलला. हा IAS अधिकारी कोण आहे?

असा IAS ऑफिसर सर्वांना मिळो, कार्यालयातील शेवटच्या दिवशी जे केलं त्याला सलाम
IAS Officer Anjaneyulu Dodde
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्रसंग घडला. त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले. एका IAS अधिकाऱ्याच ट्रान्सफर झालं होतं. कार्यालयातील शेवटच्या दिवशी या आयएएस अधिकाऱ्याने चक्क शिपायाचे आशिर्वाद घेतले. IAS ऑफिसर शिपायाच्या पाया पडतोय हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण गहिवरले. या कृतीतून आयएएस अधिकाऱ्याचा मोठेपणा दिसून आला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून सर्वच जण या आयएएस अधिकाऱ्याच कौतुक करतायत.

ए दोड्डे असं या IAS अधिकाऱ्याच नाव आहे. पलामू जिल्ह्याला एक वर्ष ए दोड्डे यांनी उपायुक्त म्हणून सेवा दिली. शुक्रवारी त्यांचा कार्यालयातील अखेरचा दिवस होता.

पाया पडताना IAS अधिकारी एक मोठी गोष्ट बोलला

ए दोड्डे आता दुसऱ्या जिल्ह्यात काम करणार आहे. पलामू जिल्हा सोडून जाताना ए दोड्डे कार्यालयातील शिपाई नंदलाल प्रसाद यांच्या पाया पडले. त्यांचे आशिर्वाद घेतले. पाया पडताना ते एक मोठी गोष्ट सुद्धा बोलले. कुठल्याही अधिकाऱ्याची सर्वात जास्त कोणी सेवा करतो, तो कार्यालयातील शिपाई असतो, असं ए दोड्डे म्हणाले. माझे वडिलही शिपाई होते, असं ए दोड्डे यांनी सांगितलं.

अशी अपेक्षा कोणालाच नव्हती

एका जिल्ह्याचा प्रमुख शिपायाच्या पाया पडतो व माझे वडिलही प्यून होते असं सांगतो, हे अपवादानेच घडतं. ए दोड्डे यांनी शिपायाला चरण स्पर्श केला, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. ए दोड्डे यांनी अन्य कर्मचाऱ्यांना शाल देऊन सन्मानित केलं. ए दोड्डे यांनी आपल्या कृतीने सर्वांचच मन जिंकलं. प्रत्येक अधिकाऱ्याला बदलीच्यावेळी फेयरवेल दिलं जातं. पण यावेळी जे घडलं, त्याची अपेक्षा कोणी केली नव्हती.